Posts

सारून टाका

थालीपीठात शिळी भाजी सारून टाका सारून टाका अर्जासोबत हरी पत्ती  चारून टाका चारून टाका घरात बसून ‘on my way’ सांगून टाका सांगून टाका चॅटवरती ॲान्लाईन बसून एखाद् पिक्चर मारून टाका उंच गोरा उच्चशिक्षित छापून टाका छापून टाका एकांतात  सगळा  केक   चापून टाका चापून टाका वट्ट ‘ नथ्थिंग टू डिक्लेअर ’  कस्टम्सवरती मारून टाका उनाड  एका सुट्टीची  पावती   ‘ सीक ’ नावानं फाडून टाका

माती

Image
  माती पहिल्या सरींची, हवीशी गंधाळ माती  अतिवृष्टीची नकोशी, ती चिखल माती  कुशाग्र बोटांने उमटली, नितळ शिल्पं माती आयुष्याच्या चक्रावर, रचे कुंभार माती  कोकणी नागमोडी, वळणाची तांबूस माती आनंदरंगात रंगे, वेडी धुळवड माती मोटारीने जागवे गावची कोरडी माती नदीकाठच्या आठवणींची, हळवी ओली माती आई बाळास शिकवे , “खाऊ नये माती”  बालहस्तकलेची गोंडस ती चिकण माती  रुजणारी मुळे, कसदार काळी माती कृषी घामातून उगते, मातीतून श्रीमंती समुद्रलाटांच्या आग्रहाने, खडकांची रेती तप्त वाळवंटी रेतीत, कुठे हरवलेली माती  मंगळग्रही वादळे, विक्राळ अवकाश माती प्रयोगशाळेत बद्ध, असे गूढ ती चंद्रमाती मातीची घरे अन मातीच्याच चुली  मातीतून आम्ही आणि मातीतुन तुम्ही मातीतच विसावा अखेर होऊन राख माती  सुdhir Add caption

मगरमाकड

  ~~~ मगरमाकड~~~ मागच्या महिन्यात आमच्या “मोनोलॉग” ग्रुप वर लिहायला विषय दिला “चंचल किंवा चंचलता”. ग्रुप वर संवेदनशील कवियत्री आहेत, पण असे नाजूक विषय दिले की माझी गडबड होते. त्यामुळे, मला पहिल्यांदा आठवला आमच्या वर्गातला सिंधी “चंचलानी”. त्याचा चंचल स्वभावाशी खरं म्हणजे काही संबंध नाही. उलट चंचल मुलींना शांतपणे गालातल्या गालात हसत सहज पटवेल अशी personality. पण आठवला. हेच काय तो उंच स्वरात मातादीची भजनं गाणारा “चंचल” पण आठवला. त्याचा छान चंचल स्वर एके दिवशी छताला अडकून बसला, तोच तो. चंचल विषयावरून चंचलानी आणि गाणारा चंचल आठवणं म्हणजे माझ्याच चंचल आणि अस्वस्थ स्वभावाचं लक्षण म्हणावं लागेल.असो.  पण खरेखुरे चंचलानी काही कमी नसतात. फुग्यात हवा भरायची आणि (फुग्याचे) तोंड न बांधता फुगा सोडून द्यायचा, मग तो कसाही कुठेही, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात फूस फूस करत सुसाट सुटतो, तसे हे चंचल लोकं. एकदा विचारांच्या या कप्प्यात तर एकदा दुसऱ्या. कधी कधी तर ते कोपरे इतके मिक्स होतात की, डोकं एका कोपऱ्यात आणि जीभ दुसऱ्या. म्हणायचं एक असतं, बोलतात दुसरंच. अशी लोकं, ड्रायविंग करताना चौकात कुठं वळा...

मी नटवलेल्या मदनिका

Image
मी नटवलेल्या मदनिका कॉकटेल ड्रिंक हे सुंदर स्त्री सारखे असते. यात प्रत्येकीची स्वतःची style आहे. प्रत्येकीचे स्वतःचे सौन्दर्य आणि अदा वेगवेगळी. मोहक पणा वेगळा. कोणाला कोण आवडेल सांगता येत नाही. ते पहिलं प्रेम कोणाशी जडेल त्याचा अंदाज घेता येणार नाही. तसंच कोणतं कॉकटेल कोणाला पटकन आवडेल हे सांगता येत नाही.  स्त्री जशी आरशासमोर बसून, ड्रेसिंग ड्रॉवर मधल्या गोष्टी वापरून शृंगार करते. तशा या कॉकटेल्स घरातल्या बार मधून सुंदर होऊन बाहेर येतात. या सौन्दर्य प्रसाधनाच्या ड्रेसर ड्रॉवर मध्ये सगळ्या गोष्टी असतात. त्यात रम, जिन, व्हिस्की, वोडका, taquila हे अगदी बेसिक. ते असायलाच पाहिजे. लाईम जुस, सोडा, साखर सुद्धा प्रत्येकीच्या खणात. त्यात ड्राय व्हरमुथ, स्वीट व्हरमुथ, ट्रिपल सेक हे मात्रं प्रत्येकीच्या आवडी निवडी नुसार. बिटर्स नावाचा शेवटी मारण्याचा ऍरोमॅटिक perfume असतो.  प्रत्येकीला तयार करताना, नटवताना, एकत्र वेळ घालवताना, जो काही स्वभाव आणि अदा लक्षात आली ती अशी.  मार्गारिटा - ही नेहेमीचीच, पण तेव्हढीच नेहेमी आवडणारी. हिला सजवताना मला सारखी त्या मराठी रोमँटिक गाण्याची आठवण येत...

पाचोळा

  या जमिनीवर गरगरत पडणाऱ्या, लाल-पिवळ्या-केशरी रंगाच्या पानांकडे बघत, एक मजेशीर विचार माझ्या मनात येतो. ही झाडं इतकी माणसांच्या विपरित कशी ? अगदी basic फरक काय तर, ही झाडं कायम ज्याचा त्याग करतात जे त्यांनाच लागतं ! हे म्हणजे अगदीच माणूस जातीच्या विरुद्ध !  माणूस आपल्याला नको असेल ते सुद्धा जमवत राहातो. कशाचा त्याग करत असतील ही झाडं ? oxygen हो ! oxygen नाही का, झाडं घेतात, जगण्याकरता पाहिजे म्हणून. पण सोडून पण देतात दुसऱ्या करता ! आपण काय सोडतो ? Carbon Dioxide ? कोणाला काय उपयोग त्याचा ?! आणि आता हिवाळा जवळ आलाय , तर हे सगळी झाडं, ब्लॅंकेट, स्वेटर वैगेरे घालून गुडूप व्हायचं ना ! तर उलट पानांच्या स्वरूपातले कपडे फेकून तोकड्या कपड्यांवर कुठे चालले हे सगळे ?  हा काही उन्हाळा आहे का, रंगेबिरंगी कपडे घालून vacation ला बीच वर जायला ? एक मान्यं आहे,  पूर्ण उन्हाळा भर दुसऱ्यांना सावली देण्याचं कर्तव्य करून, त्यांना पण थोडी विश्रांती पाहिजेच आता ! पण या दिवसात असं बिकिनीवर थंडी कशी नाही वाजत ? काही सांगता येत नाही यांना उलट गरम होत असेल.  आणि या रंगेबेरंगी सुंदऱ्यांमध्...

अर्धमेले आ s s ले

  ~~~ अर्धमेले आ s s ले ! ~~~ भरत जाधव च्या “सही रे सही” नाटकामध्ये, त्याने रंगवलेले पात्रं म्हणजे मिस्टर गलगले. हे गलगले स्वतःच्याच  हालचालींची स्वतःच commentry करतात. गलगले आ s s ले ! असं शेवटचा शब्दं लांबवून एका विशिष्ट टोन मध्ये. गलगले उ s s ठले, गलगले चा s s लले, गलगले ब s s सले, गलगलेंना राग आ s s  ला वैगेरे वैगेरे. खूप धमाल होती.  अश्याच गलगलेंवर वर आधारित आणि त्यांच्या नावाशी rhyming असं माझं पात्रं आहे आज. ह्यांचं नाव आहे “अर्धमेले”. हे अर्धमेले मात्रं मिस्टर किंवा मिसेस कोणीही असू शकतं. हे पात्रं विनोदी नाही. हे स्वतः स्वतःची कॉमेंटरी पण करत नाहीत, दुसरे करतात,म्हणून मी आज त्यांची करणार आहे. तुमच्या आजूबाजूला हे मिस्टर किंवा मिसेस अर्धमेले कुठेना कुठेतरी दिसतात . मग तुम्ही म्हणता “अर्धमेले आ s s ले !” हे अर्धमेले, मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या नावाखाली जिवंतपणीच अर्धमेले झालेले आहेत. त्यांना भरभरून जगण्यापेक्षा मरणाचीच जास्तं ओढ ! हे अर्धमेले आजूबाजूच्या वातावरणात आणि माणसांमध्ये एक प्रकारची मळभ पसरवतात. यांना कोणतीही passion नाही. ते कायम उदासीन. हे अर्धम...

“हो किंवा नाही?” चे उत्तर

  “हो किंवा नाही?” चे उत्तर  प्रत्येक “हो किंवा नाही?” चे उत्तर बऱ्याच वेळा “हो आणि नाही” असंच असतं असं अनुभवाने लक्षात आलंय. गोधळलांत ? मुळात एखाद्या प्रश्नाचं उत्तर, हो आणि नाही असं दोन्ही असू शकतं, हे मला अमेरिकेत आल्यावर कळलं. अमेरिकेतल्या पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्ये एकाला “Yes or no ? ” असा प्रश्नं विचारला तर त्याने उत्तर दिलं “well, yes AND no!”. मी पहिल्यांदाच असं मूर्खांसारखं उत्तर ऐकत होतो. मनातल्या मनात हसलो. शाळेतल्या एका मारकुट्या मास्तरांची आठवण झाली, “सांग, हो का नाही?” असं दरडावून विचारल्यावर एका शब्दात उत्तर आलं नाही, म्हणून त्या विद्यार्थ्याने मार खाल्ला होता. या मास्तरांचा मार खात असताना, मास्तर अदृश्य केले तर मुलगा सध्याचा आयटम डान्स करतोय असं वाटेल असे सटासट मारायचे. असो.  प्रत्येक हो हा नाही च्या आधाराने, प्रत्येक नाही हा हो च्या आधाराने उभा असतो. जशी दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्रं आहे म्हणून दिवस आहे. “हो आणि नाही” हे उत्तर आता जास्तं नैसर्गिक वाटायला लागलंय. निसर्ग unpredictable आहे, तसं ह्या प्रश्नाचं उत्तर. आजचा दिवस छान उबदार आहे म्हणता म्हण...