Posts

Showing posts with the label माती

माती

  १) आज सकाळपासून तिची ही बॅकयार्ड मध्ये जाण्याची तिसरी चक्कर. दोन आठवड्याच्या वर होऊन गेले बिया लावून, अजून काही कोंब फुटेना? पुस्तकात दिल्या प्रमाणे सगळे जसे च्या तसे केले, अगदी स्टेप बाय स्टेप  - तरी असे का? ती हिरमुसली झाली. पाणी कमी दिले गेले;की जरा जास्तच दिले हे मनातल्या मनात आठवत राहिली. काही केल्या तिची बेचैनी कमी होईना..  वर्षाच्या सुरुवातीला या घरात मूव्ह होतानाच तिने बॅकयार्ड मध्ये काय काय लावायचे ते ठरवून टाकले होते. नव्या घरी, नव्या जागी स्वतःला रुजवताना, ती हे स्वप्नही रुजवत होती. त्यालाही तिच्या स्वप्नाची पूर्ण जाणीव.. त्यामुळे "तुझी बाग तुला हवी तशी कर" असे तिला सुरुवातीलाच सांगून त्याने हौशीने तिला लागणारी अवजारं, कुंड्या, खतं, रोपं असं सगळं आणून दिलं आणि त्यामुळे तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलं. जुन्या घरात सुद्धा बाल्कनी मध्ये तिने एक कोपरा हिरवाईने सजवला होता. त्या रोपांचं रुजणं, वाढणं तिला एक आत्मिक समाधान द्यायचं - नेहमीच. आपल्याला स्वतःला हे नाही अनुभवता आलं - नाही वाढवता आलं आपलं बीज आपल्या मातीत, आपल्या शरीरात... याचं शल्य अंशतः कमी व्हायचं. अने...

माती

Image
  माती पहिल्या सरींची, हवीशी गंधाळ माती  अतिवृष्टीची नकोशी, ती चिखल माती  कुशाग्र बोटांने उमटली, नितळ शिल्पं माती आयुष्याच्या चक्रावर, रचे कुंभार माती  कोकणी नागमोडी, वळणाची तांबूस माती आनंदरंगात रंगे, वेडी धुळवड माती मोटारीने जागवे गावची कोरडी माती नदीकाठच्या आठवणींची, हळवी ओली माती आई बाळास शिकवे , “खाऊ नये माती”  बालहस्तकलेची गोंडस ती चिकण माती  रुजणारी मुळे, कसदार काळी माती कृषी घामातून उगते, मातीतून श्रीमंती समुद्रलाटांच्या आग्रहाने, खडकांची रेती तप्त वाळवंटी रेतीत, कुठे हरवलेली माती  मंगळग्रही वादळे, विक्राळ अवकाश माती प्रयोगशाळेत बद्ध, असे गूढ ती चंद्रमाती मातीची घरे अन मातीच्याच चुली  मातीतून आम्ही आणि मातीतुन तुम्ही मातीतच विसावा अखेर होऊन राख माती  सुdhir Add caption

मातीची महती

  मातीची महती ~अनिता म. कांत   मातीची महती सांगू मी काय चराचराची जणू ती माय   मातीच्या कुशीत बीज सानुले आईच्या मायेने किती जपले   तरारून ये कोंब कोवळा जीवनाचा सुरु होय सोहळा   तरू वाढती गगनापार मातीत मुळे, देती आधार   फुलांचे निर्माल्य आणि पाचोळा परते मातीत होऊनी गोळा   जीवन घडे , जीवन ढळे चक्र चालते मातीच्यामुळे   साहुनी प्रखर वावेच्या झळा घागर होउनी साठवी जळा मातीची चूल तापे खापर पानात येई उन भाकर   दगड माती होई एकत्र रहाया घर डोई दे छत्र   मूर्ती देवाची , भक्त हो मग्न वासना चाळवी प्रतिमा नग्न   दोन्ही घडती एकाच हाती भाव भिन्न जरी एकच माती   पहिली सर मृद्गंध असा आईचा पदर हुंगावा जसा   किती सोसते पाणउतारे तुडविते पायी जग हे सारे   म्हणती कोणी हा “मातीमोल” “मातीत मिळसी” लावती बोल   पोटात घेई प्रमाद सारा अन्न, वस्त्र आणि देई निवारा   थकल्या देहा इथे विश्रांती मिळून जायचे मातीत अंती   मृण्मयी रूपे चिन्मयी ह...