Posts

Showing posts with the label पेय

पेय

लिहिण्यासाठी जेंव्हा ' पेय ' हा विषय मिळाला , ' दारू ' या विषयाला मुळीच न छेडण्याचा मी ठराव केला ! ' पेय ' म्हणताना आपल्याला , मादकच का आठवते ? पाणी , ज्यूस , चहा , कॉफी -  आपसूकच मागे पडते ? ताक , लस्सी , शेक्स - वेक्स काय " प्यास " भागवत नाहीत ? की उसाच्या रसाचे जया - बच्चन ' अपिलिंग ' वाटत नाहीत ? मादक - बिदक भंकस म्हणत , ठरावावर केला फोकस , पेन कागद सरसावले , मदिरेला ठरवत जाम बोगस ! मेंदूच्या मंथन घाण्यात , काही विचार भरडले   आणि दोन - चार तास खपून खपून , काही - बाही खरडले ..     मनासारखे तरी त्याला , वजन काही येईना   " क्या बात " कॉमेंट येण्याचा , फील काही देईना ..  चहा - कॉफी च्या कटिंग सोबत , दिवसभर धरला बेस , पण संध्याकाळ होता - होता , माझा वाढू लागला स्ट्रेस ! तेवढ्यात कुठून कधी नव्हे ते , नवऱ्यालाही आले प्रेम   अगं घे ब्रेक थोडासा म्हणत , ग्लास दोन भरले सेम ! लिखाण लिखाण कित्ती तुझे , थोडी निवांत हो , फ्रायडे आहे आज यार , हमे कंपनी तो दो....

मी नटवलेल्या मदनिका

Image
मी नटवलेल्या मदनिका कॉकटेल ड्रिंक हे सुंदर स्त्री सारखे असते. यात प्रत्येकीची स्वतःची style आहे. प्रत्येकीचे स्वतःचे सौन्दर्य आणि अदा वेगवेगळी. मोहक पणा वेगळा. कोणाला कोण आवडेल सांगता येत नाही. ते पहिलं प्रेम कोणाशी जडेल त्याचा अंदाज घेता येणार नाही. तसंच कोणतं कॉकटेल कोणाला पटकन आवडेल हे सांगता येत नाही.  स्त्री जशी आरशासमोर बसून, ड्रेसिंग ड्रॉवर मधल्या गोष्टी वापरून शृंगार करते. तशा या कॉकटेल्स घरातल्या बार मधून सुंदर होऊन बाहेर येतात. या सौन्दर्य प्रसाधनाच्या ड्रेसर ड्रॉवर मध्ये सगळ्या गोष्टी असतात. त्यात रम, जिन, व्हिस्की, वोडका, taquila हे अगदी बेसिक. ते असायलाच पाहिजे. लाईम जुस, सोडा, साखर सुद्धा प्रत्येकीच्या खणात. त्यात ड्राय व्हरमुथ, स्वीट व्हरमुथ, ट्रिपल सेक हे मात्रं प्रत्येकीच्या आवडी निवडी नुसार. बिटर्स नावाचा शेवटी मारण्याचा ऍरोमॅटिक perfume असतो.  प्रत्येकीला तयार करताना, नटवताना, एकत्र वेळ घालवताना, जो काही स्वभाव आणि अदा लक्षात आली ती अशी.  मार्गारिटा - ही नेहेमीचीच, पण तेव्हढीच नेहेमी आवडणारी. हिला सजवताना मला सारखी त्या मराठी रोमँटिक गाण्याची आठवण येत...

मधु

 मधु ~अनिता म.कांत मधुशाळेतील प्याल्यांमधुनी मधु छलकते लाल इथेच अमुचा स्वर्ग आणखी इथेच ताजमहाल IIधृII कुणी हासती आम्हा कुत्सित समजुनी मातीमोल कुणी करतसे थट्टा आणि कुणी लावती बोल मधुवाचुनी जीवन खोटे कुणी त्यांस सांगाल II१II मधु-मधुरा संगे भरतो स्वप्नांचा दरबार मधुशाळेच्या भिंतीन्मागे दडला साक्षात्कार लंघून जाता उम्बर्यास त्या भेटे नरक जहाल II२II पेय नसे हे अमृत समजा अजब रसायन हे एका घोटामध्ये सुखाचे येते भान नवे दु:ख-वेदनांसवे जगाया करिते शक्ती बहाल II३II एका प्याल्यामध्ये विसरती धर्म, जात अन नाव क्षणात होती समसमान ते रंक आणखी राव उत्तर सगळ्या एक “वारुणी”, भिन्न असोत सवाल!  II४II