सारून टाका

थालीपीठात शिळी भाजी

सारून टाका सारून टाका


अर्जासोबत हरी पत्ती 

चारून टाका चारून टाका


घरात बसून ‘on my way’

सांगून टाका सांगून टाका


चॅटवरती ॲान्लाईन बसून

एखाद् पिक्चर मारून टाका


उंच गोरा उच्चशिक्षित

छापून टाका छापून टाका


एकांतात सगळा केक 

चापून टाका चापून टाका


वट्ट ‘नथ्थिंग टू डिक्लेअर’ 

कस्टम्सवरती मारून टाका


उनाड एका सुट्टीची पावती 

‘सीक’ नावानं फाडून टाका

Comments

Popular posts from this blog

पूर्णविराम

भिंत

माझा बहुप्राणी प्राणी