सावली
सावली ~अनिता म. कांत शोषते माझी उदासी , खंत माझी सावली नाहते अश्रूंतही मनसोक्त माझी सावली ती कधी होते अनिता , अन तिची मी बाहुली माझ्याहुनी कित्येकदा हो , पोक्त माझी सावली चाललो काट्यांत दोघी साहिली अन काहिली आसवांची त्यामुळे आसक्त माझी सावली दु : खही ना साथ देई , हाक त्याची थांबली आज माझ्या पास राही दोस्त माझी सावली दूरच्या तार्यासवे ती खंगली मंदावली आहे मुकी माझ्यापरी , अव्यक्त माझी सावली केवढी ही वेदना , या शीरी मी वाहिली सांग ना ही काय आहे , फक्त माझी सावली मिट्ट अंधार्या मनातील घट्ट बुरुजाच्या तळी जाहली माझ्यासवे बंदिस्त माझी सावली मोडुनी संवेदना अन तोडूनिया साखळी मुक्त मी झाले परी ना मुक्त माझी सावली थांबले वळणावरी अन नजर गेली पाऊली ना कळे झाली कशाने लुप्त माझी सावली होऊनी माझी कविता वा दिव्यांची आवली सांगते माझी व्यथा उपरोक्त माझी सावली