Posts

Showing posts with the label प्राणी

माझा बहुप्राणी प्राणी

Image
खरं म्हणजे मी या लेखाचं टायटल “(माझे) पाळीव प्राणी” असं देणार होतो. पुलंदैवतांची कॉपी करून. पुलंचं आहेना “पाळीव प्राणी”. कारण इथे मी आमच्या दैवतांसारखच पाळीव प्राण्यावर राग काढणार आहे, पुलंप्रमाणे या प्राण्यांच्या मालक मालकिणींवर मात्र राग काढू शकत नाही, कारण मालक मीच आहे. म्हणून मालकाची कीव मात्र करू शकतो. परंतु इतकं साधं टायटल देऊन सुद्धा लेख अजरामर करायची आमची लायकी नाही. म्हणून जरा वेगळं “माझा बहूप्राणी प्राणी”.  तर आमचा कुत्रा “चार्ली”. त्याची खरी मालकीण माझी मुलगी रिया. तिच्या आग्रहामुळे आणला. मी पाळलेला मालक. लिहिण्याआधी तीच्या कडून परवानगी घेतली. माझा सूर पण ऐकवला. तर या आमच्या चार्ली मध्ये बरेच प्राणी सामावले आहेत. त्यामुळे मला बऱ्याच वेळा घरगुती आणि जंगली प्राण्यांचं एकत्र zoo मी चालवतो काय असा प्रश्नं पडतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एक कुत्रा आहे. कुत्र्याची सर्व कर्तव्य तो पार पडतो. आल्यागेल्यांवर चिडका चेहरा करून भुंकणे, पत्रपेटीत पत्रं नाही तर बॉम्ब टाकला आहे असे समजून पोस्टमन वर थयथयाट करणे, नको त्याचा वास घेत बसणे आणि अर्थातच एक पाय वर करून “मी चार्ली, ९९ लोकांना च...

आवडता प्राणी

                          मला प्राण्यांवर प्रेम आहे . खरे पाहता प्रेम आहे असे म्हणण्यापेक्षा दया आहे असे म्हणणे अधिक उचित ठरेल . सर्व प्राणिमात्रांवर दया करावी अशा संस्कारातून आम्ही वाढलो . त्यामुळे माझे प्राण्यांबरोबरचे नाते हे दयेपुरतेच मर्यादित आहे . ते मी मायेमध्ये कधीच रूपांतरित होऊ दिले नाही . तसा मी प्राण्यांना आजिबात घाबरत वगैरे नाही बरे का .   काही लोकांना त्यांची किळस वगैरे वाटते तसे हि मला काही वाटत नाही . पण एखादा कुत्रा समजा शेपूट   हलवत जर   मागे मागे आला तर त्याला लगेच मी हाड हाड वगैरे देखील म्हणणार नाही . पण मी त्याच्याकडे पाहीन . हा आपल्यावर झडप तर घेणार नाही ना याची खात्री करेन .   जमल्यास काही तरी खायला देईन . थोडक्यात काय तर त्या मुक्या प्राण्याला मी माझी माणुसकी दाखवेन . पण हल्ली सगळीकडे जसा दिखावू प्रेमळपणाला ऊत आला आहे ते ...