Posts

Showing posts with the label किंवा

किंवा

सचेतन किंवा अचेतन  श्वास, स्पर्श, गंध किंवा सगळ्याच्या पलीकडे  पलीकडे म्हणजे नक्की कुठे? कसे? कशासाठी? नवीन जन्म घेण्यासाठी किंवा मोक्षासाठी..  मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा सुटका..  सुटका कशातून? जन्माच्या फेऱ्यातून किंवा फेऱ्यातील घोरातून? शेवटी प्राप्त काय? एक पूर्ण वर्तुळ किंवा अनेक अर्धवर्तुळे  अर्धवर्तुळांना काय अर्थ नाही? अर्थ असेल किंवा नसेल  समजेल तो वाचेल किंवा मग फसेल  वाचेल कशातून? फसेल कशात? जन्म किंवा मृत्यू  कोडे किंवा उत्तर  काय म्हणालात, अत्तर? उडून जायचे यथावकाश  सोडून आठवणींचा गंध..  सचेतनाच्या अवकाशात  किंवा अचेतनाच्या प्रवासासाठी !! ~प्रीती देशपांडे

“हो किंवा नाही?” चे उत्तर

  “हो किंवा नाही?” चे उत्तर  प्रत्येक “हो किंवा नाही?” चे उत्तर बऱ्याच वेळा “हो आणि नाही” असंच असतं असं अनुभवाने लक्षात आलंय. गोधळलांत ? मुळात एखाद्या प्रश्नाचं उत्तर, हो आणि नाही असं दोन्ही असू शकतं, हे मला अमेरिकेत आल्यावर कळलं. अमेरिकेतल्या पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्ये एकाला “Yes or no ? ” असा प्रश्नं विचारला तर त्याने उत्तर दिलं “well, yes AND no!”. मी पहिल्यांदाच असं मूर्खांसारखं उत्तर ऐकत होतो. मनातल्या मनात हसलो. शाळेतल्या एका मारकुट्या मास्तरांची आठवण झाली, “सांग, हो का नाही?” असं दरडावून विचारल्यावर एका शब्दात उत्तर आलं नाही, म्हणून त्या विद्यार्थ्याने मार खाल्ला होता. या मास्तरांचा मार खात असताना, मास्तर अदृश्य केले तर मुलगा सध्याचा आयटम डान्स करतोय असं वाटेल असे सटासट मारायचे. असो.  प्रत्येक हो हा नाही च्या आधाराने, प्रत्येक नाही हा हो च्या आधाराने उभा असतो. जशी दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्रं आहे म्हणून दिवस आहे. “हो आणि नाही” हे उत्तर आता जास्तं नैसर्गिक वाटायला लागलंय. निसर्ग unpredictable आहे, तसं ह्या प्रश्नाचं उत्तर. आजचा दिवस छान उबदार आहे म्हणता म्हण...

किंवा

 किंवा ~ अनिता म. कांत कधी अनोख्या वळणावरती घेऊन जाई प्रवास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास   दूरवरी मिळतात कुठेसे स्वप्न आणखी जाग धूसरशा त्या क्षितिजावरती कुणी छेडते राग कणखरसा मुलतानी किंवा हळवा भीमपलास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II   जमल्या गोपी, रमली राधा ढळता कातरवेळ यमुनाकाठी कान्हा रचतो जगावेगळा खेळ अध्यात्माची सीमा किंवा शृंगाराचा रास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II   कधी मनाचे उडे पाखरू स्वच्छंदी गगनात भरून घेई चंद्र चांदण्या अपुल्या दो पंखात हाय! अपुर्या इच्छा किंवा खुळा आत्मविश्वास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II   कधी दु:खाची धूर्त चेटकी अशी करी जादू जर्जर वाटे जीवन सारे पिचके, तकलादू चूक आपली असते किंवा दुर्दैवाचा फास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II   कधी बरसते सुख होऊनी सोनेरी किरणे ओठांवरती सहज उमटते सुरेलसे गाणे ऐहिक का हे सारे किंवा आत्म्याचा उल्हास उभे समोरी दोन मार्ग अन एक विरोधाभास II   डोळ्यांमधुनी तुझ्या वाहते शतकांची आश...