Posts

Showing posts with the label उपरोध

सारून टाका

थालीपीठात शिळी भाजी सारून टाका सारून टाका अर्जासोबत हरी पत्ती  चारून टाका चारून टाका घरात बसून ‘on my way’ सांगून टाका सांगून टाका चॅटवरती ॲान्लाईन बसून एखाद् पिक्चर मारून टाका उंच गोरा उच्चशिक्षित छापून टाका छापून टाका एकांतात  सगळा  केक   चापून टाका चापून टाका वट्ट ‘ नथ्थिंग टू डिक्लेअर ’  कस्टम्सवरती मारून टाका उनाड  एका सुट्टीची  पावती   ‘ सीक ’ नावानं फाडून टाका

अर्धमेले आ s s ले

  ~~~ अर्धमेले आ s s ले ! ~~~ भरत जाधव च्या “सही रे सही” नाटकामध्ये, त्याने रंगवलेले पात्रं म्हणजे मिस्टर गलगले. हे गलगले स्वतःच्याच  हालचालींची स्वतःच commentry करतात. गलगले आ s s ले ! असं शेवटचा शब्दं लांबवून एका विशिष्ट टोन मध्ये. गलगले उ s s ठले, गलगले चा s s लले, गलगले ब s s सले, गलगलेंना राग आ s s  ला वैगेरे वैगेरे. खूप धमाल होती.  अश्याच गलगलेंवर वर आधारित आणि त्यांच्या नावाशी rhyming असं माझं पात्रं आहे आज. ह्यांचं नाव आहे “अर्धमेले”. हे अर्धमेले मात्रं मिस्टर किंवा मिसेस कोणीही असू शकतं. हे पात्रं विनोदी नाही. हे स्वतः स्वतःची कॉमेंटरी पण करत नाहीत, दुसरे करतात,म्हणून मी आज त्यांची करणार आहे. तुमच्या आजूबाजूला हे मिस्टर किंवा मिसेस अर्धमेले कुठेना कुठेतरी दिसतात . मग तुम्ही म्हणता “अर्धमेले आ s s ले !” हे अर्धमेले, मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या नावाखाली जिवंतपणीच अर्धमेले झालेले आहेत. त्यांना भरभरून जगण्यापेक्षा मरणाचीच जास्तं ओढ ! हे अर्धमेले आजूबाजूच्या वातावरणात आणि माणसांमध्ये एक प्रकारची मळभ पसरवतात. यांना कोणतीही passion नाही. ते कायम उदासीन. हे अर्धम...

कवितेचा भडीमार

  कवितेचा भडीमार ~अनिता म. कांत स्वत:वर टीका करता आली पाहिजे....   पाडू पाडू पाडू, आम्ही कविता पाडू अशी लेखणी हातामध्ये, जसा शोभतो झाडू आम्ही कविता पाडू ll धृ ll   यमकाचे नच आम्हां सोयर मात्रांचे का सूतक असावे ? ढक्कलगाडी मध्ये शब्द नि अर्थाना कोंबून बसवावे अकलेचे तोडू तारे , बुद्धीचे कागद फाडू     पण आम्ही कविता पाडू II १ II   कविता पडता अमुची ठंडी घालू तिला भक्तीची बंडी रडू बेगडे गत काळावर फिरवू स्त्रीमुक्तीची झंडी साध्याभोळ्या रसिक जनांची नाडी झटकनी ताडू अन , आम्ही कविता पाडू II २ II   माथी मारू आप्तजनांच्या वाजवूनही घेऊ टाळी तवा तापला WhatsApp चा शेकून घेऊ अपुली पोळी करी वाहवा मेहुणी , जरी डोके धरती साडू पण आम्ही कविता पाडू II ३ II   फिरवून भाषेवर वरवंटा आम्ही वाजवू अमुची घंटा काढे पाजून रोज सकाळी बळकट करितो अपुला खुंटा उठता चापटपोळी आणिक बसता धम्मक लाडू पण आम्ही कविता पाडू   II ४ II   यमकासाठी आपुली दिंडी थेट पोहोचते रावळपिंडी शब्दांचे शिरकाण करीतसे ...