मगरमाकड
~~~ मगरमाकड~~~ मागच्या महिन्यात आमच्या “मोनोलॉग” ग्रुप वर लिहायला विषय दिला “चंचल किंवा चंचलता”. ग्रुप वर संवेदनशील कवियत्री आहेत, पण असे नाजूक विषय दिले की माझी गडबड होते. त्यामुळे, मला पहिल्यांदा आठवला आमच्या वर्गातला सिंधी “चंचलानी”. त्याचा चंचल स्वभावाशी खरं म्हणजे काही संबंध नाही. उलट चंचल मुलींना शांतपणे गालातल्या गालात हसत सहज पटवेल अशी personality. पण आठवला. हेच काय तो उंच स्वरात मातादीची भजनं गाणारा “चंचल” पण आठवला. त्याचा छान चंचल स्वर एके दिवशी छताला अडकून बसला, तोच तो. चंचल विषयावरून चंचलानी आणि गाणारा चंचल आठवणं म्हणजे माझ्याच चंचल आणि अस्वस्थ स्वभावाचं लक्षण म्हणावं लागेल.असो. पण खरेखुरे चंचलानी काही कमी नसतात. फुग्यात हवा भरायची आणि (फुग्याचे) तोंड न बांधता फुगा सोडून द्यायचा, मग तो कसाही कुठेही, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात फूस फूस करत सुसाट सुटतो, तसे हे चंचल लोकं. एकदा विचारांच्या या कप्प्यात तर एकदा दुसऱ्या. कधी कधी तर ते कोपरे इतके मिक्स होतात की, डोकं एका कोपऱ्यात आणि जीभ दुसऱ्या. म्हणायचं एक असतं, बोलतात दुसरंच. अशी लोकं, ड्रायविंग करताना चौकात कुठं वळा...