माती

 माती

पहिल्या सरींची, हवीशी गंधाळ माती 

अतिवृष्टीची नकोशी, ती चिखल माती 


कुशाग्र बोटांने उमटली, नितळ शिल्पं माती

आयुष्याच्या चक्रावर, रचे कुंभार माती 


कोकणी नागमोडी, वळणाची तांबूस माती

आनंदरंगात रंगे, वेडी धुळवड माती


मोटारीने जागवे गावची कोरडी माती

नदीकाठच्या आठवणींची, हळवी ओली माती


आई बाळास शिकवे , “खाऊ नये माती” 

बालहस्तकलेची गोंडस ती चिकण माती 


रुजणारी मुळे, कसदार काळी माती

कृषी घामातून उगते, मातीतून श्रीमंती


समुद्रलाटांच्या आग्रहाने, खडकांची रेती

तप्त वाळवंटी रेतीत, कुठे हरवलेली माती 


मंगळग्रही वादळे, विक्राळ अवकाश माती

प्रयोगशाळेत बद्ध, असे गूढ ती चंद्रमाती


मातीची घरे अन मातीच्याच चुली 

मातीतून आम्ही आणि मातीतुन तुम्ही

मातीतच विसावा अखेर होऊन राख माती 


सुdhir


Add caption


Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू