अर्धमेले आ s s ले
~~~ अर्धमेले आ s s ले ! ~~~ भरत जाधव च्या “सही रे सही” नाटकामध्ये, त्याने रंगवलेले पात्रं म्हणजे मिस्टर गलगले. हे गलगले स्वतःच्याच हालचालींची स्वतःच commentry करतात. गलगले आ s s ले ! असं शेवटचा शब्दं लांबवून एका विशिष्ट टोन मध्ये. गलगले उ s s ठले, गलगले चा s s लले, गलगले ब s s सले, गलगलेंना राग आ s s ला वैगेरे वैगेरे. खूप धमाल होती. अश्याच गलगलेंवर वर आधारित आणि त्यांच्या नावाशी rhyming असं माझं पात्रं आहे आज. ह्यांचं नाव आहे “अर्धमेले”. हे अर्धमेले मात्रं मिस्टर किंवा मिसेस कोणीही असू शकतं. हे पात्रं विनोदी नाही. हे स्वतः स्वतःची कॉमेंटरी पण करत नाहीत, दुसरे करतात,म्हणून मी आज त्यांची करणार आहे. तुमच्या आजूबाजूला हे मिस्टर किंवा मिसेस अर्धमेले कुठेना कुठेतरी दिसतात . मग तुम्ही म्हणता “अर्धमेले आ s s ले !” हे अर्धमेले, मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या नावाखाली जिवंतपणीच अर्धमेले झालेले आहेत. त्यांना भरभरून जगण्यापेक्षा मरणाचीच जास्तं ओढ ! हे अर्धमेले आजूबाजूच्या वातावरणात आणि माणसांमध्ये एक प्रकारची मळभ पसरवतात. यांना कोणतीही passion नाही. ते कायम उदासीन. हे अर्धम...