Posts

Showing posts with the label Social Media

काना आणि मात्रा

  काना आणि मात्रा ~अनिता म. कांत   WhatsA pp वर मराठी typing करून भाषेची धूळधाण उडवणाऱ्या हौशी वीरांसाठी: धरुनिया आस I मराठीत खास टंकलेखनास I शुभारंभ II   परक्या लिपीत I शब्दांना कोम्बीत होई गुंतागुंत I बोटांमाजी II   काना आणि मात्रा I यांची अंतयात्रा भिवविते गात्रा I वाक्य-पंक्ती II   डोहात सावळ्या I भावनेत भोळ्या खाती गटांगळ्या I विराम-चिन्हे II   विचारांचे घोडे I धावे पुढेपुढे शब्दही बापुडे I मागे येती II   अगम्यची अर्थ I होतसे अनर्थ अक्षरांची व्यर्थ I फरफट II   ठेवावा आदर I करावा उद्धार वाचवी सत्वर I मायबोली II