Posts

Showing posts with the label घर

नाट्य

  चौकोना-चौकोनात वसलेली घरे.. आणि घरा-घरात  असलेली माणसे, माणासांच्या वेगवेगळ्या तऱ्हां.. ..नशिबाचे उलट-सुलट फासे.   आजूबाजूला वाढलेली झाडे.. आणि झाडांच्या भोवताली रोपे, रोपांच्या वेगवेगळ्या जाती... ..फांद्यांवर पक्ष्यांचे खोपे.   एक विस्तीर्ण पसरलेले आकाश.. आणि आकाशात ढगांचे ठिपके, ठिपक्यांच्या वेगवेगळ्या नक्ष्या.. .. उगीचच झेपावणारे  झोके.   हा सगळा पसारा मांडून, मग आवरत-सावरत बसलेला तो - ..आणि, एन्ट्री - एक्झीट च्या फेऱ्यात अडकलेले, बाकी उरलेले सगळेच !!  ~प्रीती देशपांडे

रस्ते, घरे, वगैरे..

  रस्ते असतात - आपल्याच जागी, मुकाट, बांधून ठेवलेले. जशी असतात घरे - आपल्याच जागी निपचित पडलेली. आणि रस्ता व घर यांच्यामधील, आपण सगळे; तळ्यात-मळ्यात करणारे  कधी रस्त्यांना वेग , तर कधी घरांना स्थैर्य देणारे…  रस्ते चुकतात कधी कधी - आणि घरेही उध्वस्त होतात.  आपण जिवंत पुतळे…  फरफटतो या दोन निर्जीवांत  कधी रस्त्याकडे तर कधी घराकडे  आशेने बघत…  काही बदलले किंवा नाही बदलले  तरीही, प्रवास चालूच राहतो  रस्त्यावरून घराकडे  अथवा घराकडून रस्त्याकडे  कधी जोडत तर कधी तोडत  अखंडपणे …  ~प्रीती देशपांडे

घर

  घर   दु:खाचा आणि माझा घरोबा तसा जुनाच आहे!   ते माझ्या घरी कधीही उगवतं... धुमकेतुसारखं वेळ-अवेळ, दिवस-रात्र, उन-पाउस, कशाचाही मुलाहिजा न ठेवता. पण आगंतुकासारखं नाही... खूप दिवस परदेशी राहून घरी परत आलेल्या आपल्या माणसासारखं!   पण आल्यावर साधं ओळखीचं हसू नाही...चौकशी नाही.. ”कशी आहेस? मागच्या वेळेपेक्षा रोड दिसते आहेस...” काही नाही कर्तव्य केल्याप्रमाणे घरात घुसायचं... एकटी होतीस न म्हणून आलोय, असा काही भाव..... साथीचं आश्वासन नाही की सोडून जाण्याची धमकी नाही   मग काय! घरभर मांडून ठेवलेला पसारा लिहून फाडून टाकलेले कागद... कोणी लेखक बिखक आहे की काय कोण जाणे! घरातले सामान वापरते की सरावाने... पण कधी केलेल्या एखाद्या पदार्थाचे कौतुक नाही.. असंही नवीन नाहीच ती भावना.. कधी आपणहून बोलायला जावं तर हुं नाही की चुं नाही मात्र न बोलताही घरात उमटते त्याची गुंज ...सर्वत्र!   नाही म्हणायला   झोपायच्या खोलीतील खिडकीतून दिसणार्या चंद्राशी डोळे भिडवताना पाहिलंय मी... नीळं-सावळं आकाश आणि दु:ख यात नातं आहे...

तिनकोंके नशेमन तक

  माझ्यासाठी घर ही कधीच एक ‘वास्तू’ नव्हती. मुळात चार खोल्यांमध्ये बंदिस्त असलेलं आयुष्य कधी अनुभवलंच नाही. म्हणजे आयुष्य बंदिस्त नव्हतंच तसं. तरी दिवसभराचं ‘जगणं’ या संज्ञेत सामावेल, असं सगळं करून झाल्यावर, अंग टाकायला जिथे परत येता येईल, अशा चार खोल्या नव्हत्याच! होत्या फक्त दोन. आणि स्वतःचे दोनाचे चार झाल्यावरही, मुंबई-पुण्यातील लौकिकार्थानं ज्याला घर म्हणता येईल, अशा काही खोल्या मागे सुटल्या त्या सुटल्याच! अमेरिकेसारख्या मोठ्या देशातल्या, एका मोठ्या राज्यात, छोटंसं अपार्टमेंट राहायला असलं, तरी त्याला घर म्हणवत नाही. मुळात, हे माझं अमेरिकेतील पाचवं-सहावं अपार्टमेंट असेल. आणि बे एरियातील वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत असल्याने कुठेतरी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहण्यासाठी एक कायमस्वरूपी खोका बांधून ठेवावा, असं कधी वाटलंच नाही.   शाळा-कॉलेजात असताना स्वतःच्या घरात जितका वेळ घालवायचो, तितकाच मित्रांच्या घरातही घालवला असेल. किंबहुना इंजिनिअरिंगला असताना तर मरिन ड्राईव्ह, बॅंड स्टँड, गिरगाव चौपाटी, अशा ठिकाणी घरापेक्षाही जास्त वेळ घालवला. शालेय आयुष्यातील दिवाळीची आणि...