“हो किंवा नाही?” चे उत्तर प्रत्येक “हो किंवा नाही?” चे उत्तर बऱ्याच वेळा “हो आणि नाही” असंच असतं असं अनुभवाने लक्षात आलंय. गोधळलांत ? मुळात एखाद्या प्रश्नाचं उत्तर, हो आणि नाही असं दोन्ही असू शकतं, हे मला अमेरिकेत आल्यावर कळलं. अमेरिकेतल्या पहिल्या दुसऱ्या मीटिंग मध्ये एकाला “Yes or no ? ” असा प्रश्नं विचारला तर त्याने उत्तर दिलं “well, yes AND no!”. मी पहिल्यांदाच असं मूर्खांसारखं उत्तर ऐकत होतो. मनातल्या मनात हसलो. शाळेतल्या एका मारकुट्या मास्तरांची आठवण झाली, “सांग, हो का नाही?” असं दरडावून विचारल्यावर एका शब्दात उत्तर आलं नाही, म्हणून त्या विद्यार्थ्याने मार खाल्ला होता. या मास्तरांचा मार खात असताना, मास्तर अदृश्य केले तर मुलगा सध्याचा आयटम डान्स करतोय असं वाटेल असे सटासट मारायचे. असो. प्रत्येक हो हा नाही च्या आधाराने, प्रत्येक नाही हा हो च्या आधाराने उभा असतो. जशी दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्रं आहे म्हणून दिवस आहे. “हो आणि नाही” हे उत्तर आता जास्तं नैसर्गिक वाटायला लागलंय. निसर्ग unpredictable आहे, तसं ह्या प्रश्नाचं उत्तर. आजचा दिवस छान उबदार आहे म्हणता म्हण...