Posts

चरैवेति…चरैवेति… - बारा दिवस, बारा राज्ये आणि बारा मोटेची अमेरिका

चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुदुम्बरम् । सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरन् ॥ असं म्हणतात की चालत राहणाऱ्यालाच मध मिळतो, आणि चालत राहणाऱ्यालाच फळ देखील मिळते. आणि म्हणून सूर्य देखील न थांबता चालतच राहतो. त्यामुळे चरैवेति… चरैवेति… चालत राहा आणि चालतच रहा… प्रवासाला निघताना आपण कुठे जाणार आहोत हे माहीत असतं; पण त्या प्रवासातून आपण काय घेऊन परत येणार आहोत, हे मात्र माहीत नसतं. आमचा San Jose ते Peoria आणि तिथून जुन्या Route 66 चा माग काढत Santa Monica पर्यंतचा प्रवासही असाच होता. बारा दिवसांत पाच हजारांहून अधिक miles आम्ही Tesla ने पार केले. नकाशावर पाहिलं तर अमेरिकेच्या बारा states मधून जाणारी एक लांबलचक रेघ. पण प्रत्यक्षात त्या रेघेवर आम्हाला अनेक वेगवेगळ्या America भेटल्या. कुठे अफाट मोकळी जमीन, कुठे बर्फासारख्या पांढऱ्या salt flats, कुठे हिरवीगार शेतं, कुठे गजबजलेली शहरं, कुठे शंभर वर्षांपूर्वीच्या वैभवाच्या खुणा घेऊन उभी असलेली ओसाड गावं, कुठे शेकडो डबे घेऊन धावणाऱ्या मालगाड्या आणि कुठे क्षितिजापर्यंत पसरलेलं वाळवंट… Sacramento मागे टाकल्यावर हळूहळू आपली ओळखीची California ...