Posts

सनी साईड अप

 शनिवार नि रविवार सकाळी कितीही उशीरा उठायचं ठरवलं, तरी शक्य होतंच असं नाही. मुळात, उशीरापर्यंत लोळत पडणे, ही शिकरण नि मटार उसळीच्या पुढच्या लेव्हलची चैन आहे, हे आमच्यासारख्याना कधी कळणार, हा प्रश्नच आहे. बाकी काही असो वा नसो, पोटच्या पोरासाठी त्याच्या आवडीचं 'सनी साईड अप' आणि 'बेकन बाय द साईड' नाश्त्याला करणं, हे एकमेव 'मोटिव्हेशन' सकाळी लवकर किंवा 'वेळेवर' उठण्यासाठी पुरेसं असलं पाहिजे, हे आमच्या आईवडिलांनी आमच्यातल्या आईवडिलांना लहानपणापासूनच नीट शिकवून ठेवलंय. पोहे, उपमा, थालीपीठ, सकाळचा चहा, कॉफी, दूध यांच्या जोडीलाच स्वतःचा, नवऱ्याचा, पोरांचा डबा करणाऱ्या, आणि तरीही आठ एकोणीसची वगैरे लोकल सराईतपणे पकडणाऱ्या आया बघत मोठे झालेले आम्ही आईबाप, एकवेळ स्वतः कमी खाऊन, पोरांचं पोट भरण्याच्या आयुष्यातल्या परमकर्तव्याच्या कसोटीत नापास होऊन कसं चालेल?! इतकं मोटिव्हेशनसुद्धा बिछान्यात लोळत पडायची दिवास्वप्नं पाहणाऱ्या आमच्यासारख्याना पुरेसं पडत नसेल, तर मग त्या 'सनी साईड अप'वरच्या अंड्याच्या बलकातून दिवसाची मंगल सुरुवात करणारा सूर्यनारायणाच तुमच्याकडे प...

माती

  १) आज सकाळपासून तिची ही बॅकयार्ड मध्ये जाण्याची तिसरी चक्कर. दोन आठवड्याच्या वर होऊन गेले बिया लावून, अजून काही कोंब फुटेना? पुस्तकात दिल्या प्रमाणे सगळे जसे च्या तसे केले, अगदी स्टेप बाय स्टेप  - तरी असे का? ती हिरमुसली झाली. पाणी कमी दिले गेले;की जरा जास्तच दिले हे मनातल्या मनात आठवत राहिली. काही केल्या तिची बेचैनी कमी होईना..  वर्षाच्या सुरुवातीला या घरात मूव्ह होतानाच तिने बॅकयार्ड मध्ये काय काय लावायचे ते ठरवून टाकले होते. नव्या घरी, नव्या जागी स्वतःला रुजवताना, ती हे स्वप्नही रुजवत होती. त्यालाही तिच्या स्वप्नाची पूर्ण जाणीव.. त्यामुळे "तुझी बाग तुला हवी तशी कर" असे तिला सुरुवातीलाच सांगून त्याने हौशीने तिला लागणारी अवजारं, कुंड्या, खतं, रोपं असं सगळं आणून दिलं आणि त्यामुळे तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलं. जुन्या घरात सुद्धा बाल्कनी मध्ये तिने एक कोपरा हिरवाईने सजवला होता. त्या रोपांचं रुजणं, वाढणं तिला एक आत्मिक समाधान द्यायचं - नेहमीच. आपल्याला स्वतःला हे नाही अनुभवता आलं - नाही वाढवता आलं आपलं बीज आपल्या मातीत, आपल्या शरीरात... याचं शल्य अंशतः कमी व्हायचं. अने...

द्वंद्व !

  मोठ्या हौसेने , कित्येक वर्षांपूर्वी , त्या चित्राभोवती घातलेली ती फ्रेम , अचानक - तुटलीच . कित्ती हळहळ   वाटली तिला , काचा गोळा करताना तर अगदी वैताग - वैताग आला . त्या भिंतीवरची , ठरलेली ती जागा , आता भकास वाटू लागली .. एकदम भरूनच आलं तिला .. आपलंसं काही हरवल्यागत . जणू काही तिच्याच घराच्या चार भिंती , तुटल्या होत्या - अचानक . आणि उघडं पडलं होतं आता , वर्षानुवर्षं उरापोटी जपलेलं त्यातील एक गुपित ! चित्राकडे पाहिल्यावर , तिला दिसल्या सुरकुतलेल्या , काळपट आणि जीर्ण झालेल्या कडा . चुकलंच आपलं , तिला वाटलं .... वेळीच फ्रेम बदलायला हवी होती . चित्राच्या कागदाची अधून मधून अवस्था बघायलाच हवी होती .  जुन्या - पुराण्या त्या फ्रेम मधे , कांटाळलं असेल नाही , हे चित्रं ? तीच भिंत , तीच जागा ,  तोच कोन आणि फ्रेम सुद्धा तीच .     अजूनही दोन पर्याय आहेतच तिच्याकडे . नवी फ्रेम आणून ते चित्रं परत बंदिस्त करायचं , किंवा , उरलेले दिवस त्या चित्राला सगळ्याच चौकटीतून मुक्त करायचं ... ...

नाट्य

  चौकोना-चौकोनात वसलेली घरे.. आणि घरा-घरात  असलेली माणसे, माणासांच्या वेगवेगळ्या तऱ्हां.. ..नशिबाचे उलट-सुलट फासे.   आजूबाजूला वाढलेली झाडे.. आणि झाडांच्या भोवताली रोपे, रोपांच्या वेगवेगळ्या जाती... ..फांद्यांवर पक्ष्यांचे खोपे.   एक विस्तीर्ण पसरलेले आकाश.. आणि आकाशात ढगांचे ठिपके, ठिपक्यांच्या वेगवेगळ्या नक्ष्या.. .. उगीचच झेपावणारे  झोके.   हा सगळा पसारा मांडून, मग आवरत-सावरत बसलेला तो - ..आणि, एन्ट्री - एक्झीट च्या फेऱ्यात अडकलेले, बाकी उरलेले सगळेच !!  ~प्रीती देशपांडे

रस्ते, घरे, वगैरे..

  रस्ते असतात - आपल्याच जागी, मुकाट, बांधून ठेवलेले. जशी असतात घरे - आपल्याच जागी निपचित पडलेली. आणि रस्ता व घर यांच्यामधील, आपण सगळे; तळ्यात-मळ्यात करणारे  कधी रस्त्यांना वेग , तर कधी घरांना स्थैर्य देणारे…  रस्ते चुकतात कधी कधी - आणि घरेही उध्वस्त होतात.  आपण जिवंत पुतळे…  फरफटतो या दोन निर्जीवांत  कधी रस्त्याकडे तर कधी घराकडे  आशेने बघत…  काही बदलले किंवा नाही बदलले  तरीही, प्रवास चालूच राहतो  रस्त्यावरून घराकडे  अथवा घराकडून रस्त्याकडे  कधी जोडत तर कधी तोडत  अखंडपणे …  ~प्रीती देशपांडे

किंवा

सचेतन किंवा अचेतन  श्वास, स्पर्श, गंध किंवा सगळ्याच्या पलीकडे  पलीकडे म्हणजे नक्की कुठे? कसे? कशासाठी? नवीन जन्म घेण्यासाठी किंवा मोक्षासाठी..  मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा सुटका..  सुटका कशातून? जन्माच्या फेऱ्यातून किंवा फेऱ्यातील घोरातून? शेवटी प्राप्त काय? एक पूर्ण वर्तुळ किंवा अनेक अर्धवर्तुळे  अर्धवर्तुळांना काय अर्थ नाही? अर्थ असेल किंवा नसेल  समजेल तो वाचेल किंवा मग फसेल  वाचेल कशातून? फसेल कशात? जन्म किंवा मृत्यू  कोडे किंवा उत्तर  काय म्हणालात, अत्तर? उडून जायचे यथावकाश  सोडून आठवणींचा गंध..  सचेतनाच्या अवकाशात  किंवा अचेतनाच्या प्रवासासाठी !! ~प्रीती देशपांडे