किंवा
सचेतन किंवा अचेतन
श्वास, स्पर्श, गंध किंवा सगळ्याच्या पलीकडे
पलीकडे म्हणजे नक्की कुठे? कसे? कशासाठी?
नवीन जन्म घेण्यासाठी किंवा मोक्षासाठी..
मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा सुटका..
सुटका कशातून?
जन्माच्या फेऱ्यातून किंवा फेऱ्यातील घोरातून?
शेवटी प्राप्त काय?
एक पूर्ण वर्तुळ किंवा अनेक अर्धवर्तुळे
अर्धवर्तुळांना काय अर्थ नाही?
अर्थ असेल किंवा नसेल
समजेल तो वाचेल किंवा मग फसेल
वाचेल कशातून? फसेल कशात?
जन्म किंवा मृत्यू
कोडे किंवा उत्तर
काय म्हणालात, अत्तर?
उडून जायचे यथावकाश
सोडून आठवणींचा गंध..
सचेतनाच्या अवकाशात
किंवा अचेतनाच्या प्रवासासाठी !!
~प्रीती देशपांडे
Comments
Post a Comment