Posts

उंच उंच झुला

Image
  "First the worksheet, then swing." सॅरा म्हणाली. कधीही काहीही करायचं असलं, करवून घ्यायचं असलं माझ्याकडून की नेहमी मला हेच सांगितलं जातं. आधी होमवर्क, मग स्विंग; first clean up, then swing; आधी 'finish the food', मग स्विंग. मला आवडतो झोपाळा. खूप. विनीकडे तर खूप खूप झोपाळे आहेत. चौकोनी झोपाळा, रिंग सारखा झोपाळा, झोळीसारखा झोपाळा... झुला. झोपाळ्यावर बसलं, की सगळ्या गोष्टी कशा नीट समजायला लागतात. जमिनीवरचे पाय उचलले की मी मोकळी होते. झोपाळा वर वर जायला लागला, आणि मान अशी सोडून दिली, की डोकं वाऱ्याबरोबर वाहायला लागतं. कानात वारा भरतो, आणि आजूबाजूचे सगळे सगळे आवाज, सगळा गोंगाट बंद होतो. सगळं कसं शांत शांत... आणि मग डोळे मिटून घेतले की... माझे रंग नाचायला लागतात. पिवळा दोन, निळा चार. मला आवडतात. खूप. मला झोपाळा आवडतो. खूप.  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तिला सांभाळणं थोडं कठीण व्हायला लागलंय. लहान होती तेव्हा ...

होकारांची पिशवी

Image
सकाळी   घरातून   निघताना   ती   पर्सबरोबर   होकारांची   पिशवी   घेते .  का ठापर्यंत   भरलेली .  एखाद   दुसराच   खणखणीत   लोखंडी   किं वा   वजनदार   दगडी .  बाकी   सगळे   चकचकी त ,  वजनानं   हलके ,  कोरे   करकरीत .  वेगवेगळ्या   रंगांचे ,  गुळगुळीत   घो टीव   कागदांचे   होकार .  घरातून   निघतानाच   मीटर   न   पाडणाऱ्या   रिक्षावाल्याला   ती   एक   होकार   देऊन   टाकते .  उशीर   होतोय   म्हणून .   बॉस   आणि   कलीग्ज   साठी   राखून   ठे वलेले   होकार   तर   कसेही   संपून   जा तात .  कधी   अपरेसलवर   परिणाम   होऊ   नये   म्हणून,  कधी   नाती   बिघडू   नयेत   म्हणून,  कधी   आपल्याबद्दलची   मतं   खरा ब   होऊ   नयेत   म्हणून ,  तर कधी ...

समाधिस्थ कवितांच्या हिंदोळ्यावर

Image
  “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” असं ती जेव्हा मला विचारते, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं. ते सुचण्याची प्रक्रिया चालू व्हावी, असं वाटत असतं; तेव्हा ही मात्र डोळ्यांत कुतूहल नि अपेक्षा साठवून, स्वतःच्याच तळहातावर स्वतःचं डोकं धरून, माझ्या मांडीवर रेलून, अधाशासारखी माझ्याकडे बघत असते. मला नि:शब्द, निरुत्तर करण्यात तिला काय मजा वाटते, किंवा कशाचा अभिमान वाटतो, हे तिचं तिलाच माहीत. पण माझ्याकडे एकटक बघत बसणाऱ्या तिच्या रुपड्यातली समाधिस्थ अस्वस्था संपून जायला नको, म्हणून मीच उत्तर शोधायचं - किंवा सापडलेलं उत्तर द्यायचं टाळतो की काय - असंही कधीकधी वाटून जातं. बहारों फूल बरसाओ मधली फुलांच्या झोपाळ्यावर झुलणारी वैजयंतीमाला ही नाही. तसवीर बनाये क्या कोई, क्या कोई लिखे तुझपे कविता, म्हणावीशी शर्मिलासुद्धा ही नाही. झोपाळ्यावाचून झुलायचे, फुलायचे तिचे आणि माझेही दिवस मागे पडले. आताच्या खऱ्या जगण्यातला करडेपणा त्याच जगण्यातल्या खोटेपणाला स्वप्नांमध्येसुद्धा बहरू देत नाही. तरीसुद्धा तिच्यातल्या गृहिणीपणातलं, तिच्यातल्या मैत्रिणीतलं नि प्रेयसीतलं सोज्वळ बाईपण मी उरात का पेरतो, आणि त्या मागून...

शून्यात गर्गरे झाड

Image
  यू एस एस मिडवेच्या धावपट्टीवर एका सरळ रेषेत रचून ठेवलेल्या लढाऊ विमानांच्या मधून वाट काढत, त्या विमानांकडे डोळे विस्फारून पाहत असलेल्या चिमुकल्यांच्या बुटांच्या नाड्यांमधून वाट काढत मी त्यातल्याच एका विमानासारखा वर आकाशात झेपावलो, आणि मागे वळून बघितलं. मिडवेचा एव्हाना ठिपका होत आला होता. ते जहाज, त्या अजस्त्र युध्द्धनौकेवरचं संग्रहालय, ते बघायला आलेले लोक सगळेच जिवाणू, विषाणू म्हणावेत इतके छोटे झाले होते. काही मिनिटांपूर्वीच मी कुणाच्या तरी कोकमधला बुडबुडा झालो होतो; कुणाच्या सॅन्डविचवरचं पातळ कागदी आवरण बेदरकारपणे भिरकावून लावलं होतं; आणि मिडवेवरच्या मिजासखोर अमेरिकन राष्ट्रध्वजासकट इतरही अनेक झेंडे, पताका यांच्या असे काही नाकी नऊ आणले होते, की प्रयत्नपूर्वक एकमेकांना धरून, पाय रोवून उभे राहण्यात त्यांची तारांबळ उडत होती. पण आता मी सॅन डिएगोच्या नेव्ही पिअरपलीकडे. आणि तिथे आता फक्त अथांग पॅसिफिक महासागर. पॅसिफिकसोबत, किंबहुना त्याच्यासारखं आडवंआडवं वाहत जाणं इतकं सोयीचं आणि सवयीचं झालं होतं, की त्यात आता मजा येईनाशी झाली. मर्त्य मानवजातीनं दलांबर की आयनांबर असं काहीसं नाव दिलेल्...

फिरुनी नवी जन्मेन मी

Image
    फिरुनी नवी जन्मेन मी.  -अनिता म. कांत   “पुरू , बाळा!” पुरुषोत्तम दचकला आणि झटकन वळला. त्याचा कानावर विश्वासच बसेना. आप्पा हाक मारताहेत आणि तीही इतक्या प्रेमाने. गेल्या तीस वर्षात हे घडले नव्हते. शुश्रुषा हॉस्पिटलची recovery रूम. आप्पा बेडवर होते आणि पुरुषोत्तम त्यांना बघायला आला होता. गेले २ वर्ष neuroblastoma ने आजारी होते ते. Bone marrow purging successful झाले नव्हते . Autologous Bone marrow transplant होऊ शकत नव्हता. म्हणून donor बघावा लागला. पुरुषोत्तमनेच दिला होता bone marrow . Good match . Recovery बरी होती पण Mononucleosis झाल्याने मागचा आठवडा त्यांची रवानगी पुन्हा ICU त झाली होती. गेले चार दिवस ते recovery रूम मध्ये होते. आज भेटण्याची परवानगी मिळाल्याने पुरुषोत्तम आला होता. तशी खास इच्छा नव्हती पण बिले भरायची होती... आणि Discharge वगैरेचे ही बोलायचे होते. २० वर्षापूर्वी ह्याच हॉस्पिटलमध्ये brain infection शी झुंज देत होता तो. आई दिवस - रात्र हलली नव्हती त्याच्या जवळून. हा माणूस २१ दिवसांनी आला .... फक्त बिले भरायला. आपली business tour स...

कलयुग

Image
  “कलयुग..कलयुग”   देवळाचे दार बंद झाले तसे विठूरायाने कमरेवरचे हात खाली सोडून आळस दिला. रखुमाई तेलाची वाटी घेऊन आलीच. “दिवसभर गाऱ्हाणी.. कलयुग..कलयुग”. पण आज विठुरायांच्या चेहर्यावर मिश्किल स्मित होते. “आज नको , आज अंमळ relax व्हायला मित्राकडे जायचंय...नदीपलीकडच्या high rise मध्ये” . रखुमाई फणकार्याने म्हणाली , “अरे वा! “कीर्तना”चा प्रोग्राम जोरदार दिसतोय...काय नाव ह्या Millionaire मित्राचे? Sugar king की cassette king कि ते नवीन काहीतरी झालंय तो..” विठोबाराया हलकी शीळ घालीत म्हणाले , “छे ग! तुझा सदा संशय.. हा तर आपला पोहेसम्राट... सुदामा...”

धुके

Image
   धुके   कुठे चालली धुक्यापलीकडे तुझी नी माझी चार पावले गवसतील का तिथे आपुल्या जगण्यामधले रंग उसवले   पुन्हा भेटलो, पुन्हा हरवलो काळाच्या सरकत्या पटावर कधी बुडालो भोवर्यात अन कधी नदीच्या दोन तटांवर   “बसू या थोडे, ऐक सांगते” आयुष्याच्या या वळणाशी सुख दु:खाचा हिशेब थोडा जमले जे जे अपुल्यापाशी   कधी परतलो जर या जागी ओळख अपुली कशी पटावी ? गूज आपुल्या दोघांमधले: रिमझिम पाऊस, चंद्रमाधवी   तुझे हसू अन माझा गहिवर पुरुनी ठेऊ इथे खोलवर एक चूक अन एक भूक ही दगड खुणेचा आणिक त्यावर   रुजतील तीही , होतील स्वप्ने पसरतील ती पुन्हा नव्याने कुणा दुजाच्या मनी होऊनी तुझे नी माझे शुभ्र चांदणे अनिता म.कांत. ------------XX-------------