फिरुनी नवी जन्मेन मी
“पुरू, बाळा!” पुरुषोत्तम दचकला आणि झटकन वळला. त्याचा कानावर
विश्वासच बसेना. आप्पा हाक मारताहेत आणि तीही इतक्या प्रेमाने. गेल्या तीस वर्षात
हे घडले नव्हते. शुश्रुषा हॉस्पिटलची recovery रूम. आप्पा बेडवर होते आणि पुरुषोत्तम त्यांना बघायला आला होता. गेले २ वर्ष neuroblastomaने आजारी होते ते. Bone marrow
purging successful झाले नव्हते. Autologous Bone marrow transplant होऊ शकत नव्हता. म्हणून donor बघावा लागला. पुरुषोत्तमनेच दिला होता bone marrow. Good match. Recovery बरी होती पण Mononucleosis झाल्याने मागचा आठवडा त्यांची रवानगी पुन्हा ICUत झाली होती. गेले चार दिवस ते recovery रूम मध्ये होते. आज
भेटण्याची परवानगी मिळाल्याने पुरुषोत्तम आला होता. तशी खास इच्छा नव्हती पण बिले
भरायची होती... आणि Discharge वगैरेचे ही बोलायचे होते.
२० वर्षापूर्वी ह्याच हॉस्पिटलमध्ये brain infectionशी झुंज देत होता तो. आई दिवस-रात्र हलली नव्हती त्याच्या जवळून. हा माणूस २१ दिवसांनी आला .... फक्त बिले
भरायला. आपली business tour सोडून कसा येणार... आईने कसे यांच्याबरोबर ....
“बाळा, शमाचा फोटो घेऊन येशील?... आज आमच्या
लग्नाचा वाढदिवस आहे. येताना एक मोगर्याचा
गजरा... तिला आवडत असे” आप्पा पटकन
म्हणाले. त्यांना एव्हढे बोलूनही दम लागला. पुरुषोत्तमला
गरगरलेच! त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
आयुष्यभर झुरून मेली ती.... तुमची वाट बघत! तिला तुमचा गजरा सुद्धा नको होता.
तुमचे एक smile.... आता काय उपयोग आहे? की स्वत: च्या जीवावर बेतल्यावर उपरती झाली आहे? तो काही बोलला नाही. तो कधीच त्यांना उलटून
बोलत नसे. आईनेच शिकवले होते. चांगले ते बघ... वाईटात रेंगाळू नकोस. आप्पांचे आणि
त्याचे नातेही विचित्रच. वर्गात पहिला आला म्हणून कौतुक नाही; पण engineering ला न जाता architectureला गेला म्हणून
रागवलेही नाहीत. वेळच्या वेळी फीचे पैसे, पुस्तके,....शिक्षणात, राहणीमानात काही कमी नव्हते. कमी होते ते ....त्या एका स्पर्शाचे, एका हास्याचे...
तो फक्त म्हणाला “हो”. Roomच्या बाहेर पडला. त्याला
भडभडून आले. तो बाहेरच एका बाकावर मटकन बसला. “hello Young man”. पुरुषोत्तमने वर बघितले.
डॉक्टर पार्थसारथी round आटपून परत चालले होते. पुरुषोत्तमला रडू आवरले नाही. “Come with me...” doctor म्हणाले.
पुरुषोत्तम त्यांच्या मागोमाग गेला.
“काय झालय? ययातीची recovery चांगली दिसतेय.
काही वर्षतर नक्की ...”
पुरुषोत्तम सावरला. “thank you डॉक्टर! तुमचे skill आहेच असे..पण...काहीतरी
बदललंय”
Doctor हसले... काहीसे गूढ. “कळतंय मला.... माझीही हीच अवस्था झाली होती चार
दिवसांपूर्वी. मला म्हणाला.... मोहन, एक गोष्ट कबूल करायची आहे. तुझे chemistry नेहेमीच माझ्यापेक्षा चांगले होते. दहावीचे गोल्ड मेडल तुझेच होते खरे... ते XXX माझ्यावर खुश होते. Practicals ना तुझी गोची
केली...” याह्या आणि शिवी.... आणि त्याहीपेक्षा....माझी/कुणाचीही तारीफ....”
डॉक्टर पुढे बोलू लागले, “ययाती अतिशय हुशार...पण
एककल्ली. कुणाच्यातही मिसळणे नाही. कुणाशी बोलणे नाही. दिसायला राजबिंडा, मुली मारायच्या ...आम्हाला
मिरच्या लावून. पण तो स्वत:त गर्क होता. IIT, MIT.....व्हायचच होते ते. याह्या म्हणायचो....पाकी general होता
त्याच्यावरून...
काकांना लक्षात आला होता त्याचा हा भिन्न
स्वभाव. कोणी जवळचे मेले तरी फरक नाही ह्याच्यात. भावनाशून्य? शमा त्याच्या आयुष्यात आली. पोरकी होती ती.
आपल्या मामाकडे राहायची... तेही गरीब आणि एकटे. आयुष्याकडून काही अपेक्षा करायच्या
असतात हेही माहित नसलेली. काकानी लग्न करून दिले. तुझा जन्म ही झाला.... पण काही
फरक पडला नाही. तो त्याच्या व्यवसायात गर्क. तिची तळमळ मी जाणून होतो ना.
इथेच तर प्राण सोडला...शेवट पर्यंत दाराकडे बघत
होती...फार positive होती ती...Paintingमध्ये जीव रमवत असे. देव अश्या काही जोड्या लावतो ना....”
पुरुषोत्तम म्हणाला, “ मग आज काय उपरती
झालीये...”
“बैस, सांगतो. मलाही असेच वाटले. चार दिवसांपूर्वी सकाळी nurseला १००० रुपये दिले.
सगळ्यांशी हसून बोलत होता. काल शेवटी दम देऊन झोपवावे लागले....इतक्या गप्पा.
कुणाला तरी बोलावून साईबाबांच्या मंदिराला ५ लाख रुपयांची देणगी.... शमा देवभोळी
होती. त्याची आठवण झाली. म्हंटले मरायच्या आधी शहाणपण? पण आज काही genomic टेस्टचे results हातात आले. चमकलो.
तुझा genome आणि त्याचा जुळवला. BMT च्या आधीचा आणि आताचा. Looks like there is some transfer of genes. BMT नंतर त्याला Mononucleosis झाला होता. It is a common infection after BMT caused by Cytomegalovirus, A double stranded DNA virus. It infects brain too.
Severe होती त्याची case. वाचला..वाचला कसलं ... कायापालट. My guess is CMV
has played a major role in this double recombination. You had a brain infection
too; when you were a child.
पुरुषोत्तमला ती आठवणही नको होती. डॉक्टर पुढे
बोलू लागले.
“It will be interesting
to see which genes Yayati has received from you, more than that…which part of
the brain and if this is a stable recombination. Effect of this weird genetic
event on physiology and endocrinology is going to be a very interesting study….reversing
heredity...”
पुरुषोत्तमचे डोके सुन्न झाले. पण कसली तरी
उभारीही आली. तो तिथून निघाला. घरी आल्यावर त्याने अंघोळ केली आणि आयुष्यात प्रथमच
देवाला दिवा लावला. देव्हाऱ्यात एकुलती एक कृष्णाची मूर्ती होती. शमाच्या वडिलांनी
दिलेली! शमा गेल्यावर घरच्या आयाबाई तिची पूजा करीत असत. दुपार टळली तशी काही कामे
आटोपून त्याने आईचा एकुलता एक फोटो घेतला.. मोगऱ्याचा गजरा...हॉस्पिटलला तो
पोहोचला तेंव्हा ३-३० वाजले होते. त्याला आप्पांच्या खोलीत जायची परवानगी मिळाली.
चहाची वेळ होती. आज आप्पा उठून बसले होते. Nurse त्यांना आधार देऊन होती. आप्पा बशीत ओतून
फुंकून फुर्र करीत चहा घेत होते.....अगदी आई घ्यायची तसे. पुरुषोत्तम हळहळला. आयुष्यभर
ज्या स्पर्शासाठी आई तळमळली, तो असा मिळावा. दैव दुर्विलास. मग मानावे का.... एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी
नवी जन्मेन मी.
Comments
Post a Comment