कलयुग
“कलयुग..कलयुग”
देवळाचे दार बंद झाले तसे विठूरायाने कमरेवरचे
हात खाली सोडून आळस दिला. रखुमाई तेलाची वाटी घेऊन आलीच. “दिवसभर गाऱ्हाणी..
कलयुग..कलयुग”. पण आज विठुरायांच्या चेहर्यावर मिश्किल स्मित होते. “आज नको, आज अंमळ relax व्हायला मित्राकडे
जायचंय...नदीपलीकडच्या high rise मध्ये”. रखुमाई फणकार्याने म्हणाली, “अरे वा! “कीर्तना”चा प्रोग्राम जोरदार दिसतोय...काय नाव ह्या Millionaire मित्राचे? Sugar king की cassette king कि ते नवीन काहीतरी झालंय
तो..” विठोबाराया हलकी शीळ घालीत म्हणाले, “छे ग! तुझा सदा संशय.. हा तर आपला पोहेसम्राट...
सुदामा...”
Comments
Post a Comment