Posts

फिरुनी नवी जन्मेन मी

Image
    फिरुनी नवी जन्मेन मी.  -अनिता म. कांत   “पुरू , बाळा!” पुरुषोत्तम दचकला आणि झटकन वळला. त्याचा कानावर विश्वासच बसेना. आप्पा हाक मारताहेत आणि तीही इतक्या प्रेमाने. गेल्या तीस वर्षात हे घडले नव्हते. शुश्रुषा हॉस्पिटलची recovery रूम. आप्पा बेडवर होते आणि पुरुषोत्तम त्यांना बघायला आला होता. गेले २ वर्ष neuroblastoma ने आजारी होते ते. Bone marrow purging successful झाले नव्हते . Autologous Bone marrow transplant होऊ शकत नव्हता. म्हणून donor बघावा लागला. पुरुषोत्तमनेच दिला होता bone marrow . Good match . Recovery बरी होती पण Mononucleosis झाल्याने मागचा आठवडा त्यांची रवानगी पुन्हा ICU त झाली होती. गेले चार दिवस ते recovery रूम मध्ये होते. आज भेटण्याची परवानगी मिळाल्याने पुरुषोत्तम आला होता. तशी खास इच्छा नव्हती पण बिले भरायची होती... आणि Discharge वगैरेचे ही बोलायचे होते. २० वर्षापूर्वी ह्याच हॉस्पिटलमध्ये brain infection शी झुंज देत होता तो. आई दिवस - रात्र हलली नव्हती त्याच्या जवळून. हा माणूस २१ दिवसांनी आला .... फक्त बिले भरायला. आपली business tour स...

कलयुग

Image
  “कलयुग..कलयुग”   देवळाचे दार बंद झाले तसे विठूरायाने कमरेवरचे हात खाली सोडून आळस दिला. रखुमाई तेलाची वाटी घेऊन आलीच. “दिवसभर गाऱ्हाणी.. कलयुग..कलयुग”. पण आज विठुरायांच्या चेहर्यावर मिश्किल स्मित होते. “आज नको , आज अंमळ relax व्हायला मित्राकडे जायचंय...नदीपलीकडच्या high rise मध्ये” . रखुमाई फणकार्याने म्हणाली , “अरे वा! “कीर्तना”चा प्रोग्राम जोरदार दिसतोय...काय नाव ह्या Millionaire मित्राचे? Sugar king की cassette king कि ते नवीन काहीतरी झालंय तो..” विठोबाराया हलकी शीळ घालीत म्हणाले , “छे ग! तुझा सदा संशय.. हा तर आपला पोहेसम्राट... सुदामा...”

धुके

Image
   धुके   कुठे चालली धुक्यापलीकडे तुझी नी माझी चार पावले गवसतील का तिथे आपुल्या जगण्यामधले रंग उसवले   पुन्हा भेटलो, पुन्हा हरवलो काळाच्या सरकत्या पटावर कधी बुडालो भोवर्यात अन कधी नदीच्या दोन तटांवर   “बसू या थोडे, ऐक सांगते” आयुष्याच्या या वळणाशी सुख दु:खाचा हिशेब थोडा जमले जे जे अपुल्यापाशी   कधी परतलो जर या जागी ओळख अपुली कशी पटावी ? गूज आपुल्या दोघांमधले: रिमझिम पाऊस, चंद्रमाधवी   तुझे हसू अन माझा गहिवर पुरुनी ठेऊ इथे खोलवर एक चूक अन एक भूक ही दगड खुणेचा आणिक त्यावर   रुजतील तीही , होतील स्वप्ने पसरतील ती पुन्हा नव्याने कुणा दुजाच्या मनी होऊनी तुझे नी माझे शुभ्र चांदणे अनिता म.कांत. ------------XX-------------    

डिजिटल बैराग्याचे महानिर्वाण

Image
  गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहॉं मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया “नंबर त्वेल, मिडीयम फ्राईज, डाएट कोक?” जॅक इन द बॉक्स च्या जुनाट, तपकिरी, पंजाभर रुंदीच्या खिडकीतून आलेल्या दक्षिण अमेरिकन गोडव्याने साहिरचे शब्द फुटेनासे झाले. कुठली असेल ही? मेक्सिको? निकाराग्वा? पेरू? विचार करताकरताच बैराग्याने त्याचं अमेरिकन एक्स्प्रेस त्या गोडव्याकडे देऊन टाकलं आणि हातात कोंबलेली ब्राऊन बॅग पॅसेंजर सीटवर फेकून तो ड्राईव्ह-थ्रू मधून चालता झाला. “सर, युअर कार्ड” वगैरे खिडकीतले शब्द ऐकून न ऐकल्यासारखे करून. दक्षिण अमेरिकेतून आलेल्या, तपकिरी कातडीच्या, चुणचुणीत नि ‘हॉट’ ललना बैराग्याला स्वतःच्याच जातकुळीतील, कधीकधी रक्ताच्या नात्यातील वाटत. अमेरिकन स्वप्नाच्या ओढीने इकडे येणाऱ्या लमाणांच्या तांड्यातील सगळे शेवटी सारखेच. कुणी भिंतीवरून उड्या टाकून येतात, कुणी भुयारातून, तर आपल्यासारखे कुणी सरळमार्गी, विमानाचं तिकीट काढून नि कागदपत्रं घेऊन. इतकाच काय तो फरक. शेवटी अमेरिकेतलं कुठलं तरी छोटंमोठं शहर सगळ्यांना गिळून टाकतं. रात्रीचे १:२७ वाजले होते. साहिर, देव आनंद, रफीशी जोडलेली माझी नाळ बैरागी ...

उपज

Image
  "बाबा, तू ठीक आहेस? चित्रा आत्याचा फोन आला... मैफिलीतून मधूनच उठून गेलास.. हे असं दुसऱ्यांदा घडतंय बाबा... It's about time... झाले आता.. वर्ष होऊन गेलं आता. अजून किती वेळ घेणारेस सावरायला? आणि इतका त्रास होत असेल ना, तर मग गाण्याचे कार्यक्रम नको घेत जाऊस. लोक तुला ऐकायला मुद्दाम प्रवास करून येतात... " शर्वरी थोडी चिडलीच होती. पण तिच्या बोलण्यातली कळकळ अभिला जाणवत नक्की होती. विशाखा गेल्यापासून हा पहिलाच मोठा कार्यक्रम घेतला होता अभिने. नाही म्हणायला एक छोटी मैफल केली होती एका मित्राकडे... पण तेव्हाही गाता गाता अचानक अभिजीतला भरून आलं तिच्या आठवणीने आणि तो चक्क बंदिश अर्धीच सोडून निघून गेला. सगळेच जवळचे, त्यामुळे ह्याचा फार गवगवा झाला नाही. पण त्यानंतर आलेले चारेक कार्यक्रम अभिने असेच सोडून दिले, मानसिक तयारी नाही म्हणून. अखेर परवाचा कार्यक्रम. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून, आणि चित्राचा आग्रह म्हणून अभिने गायला होकार दिला होता. सुरुवात ठीक झाली. अगदी नेहमीसारखी रंगत नसला तरी रागविस्तार होत होता. दोन राग गाऊन झाल्यावर अभिने ठुमरी गाणार असं म्हंटलं, आणि प्रेक्षकांमधून ...

फुले का पडती शेजारी

Image
Baby moves on Santoor असा विषय असलेला ई-मेल कित्येक वर्षांनी आज अचानक दिसला आणि त्याने क्षणाचाही वेळ न दवडता, लगेच त्यातल्या YouTube linkवर क्लिक केलं. Look at the bottom left side of the belly, इतकी स्पेसिफिक सूचना पुरेशी होती. लागलीच त्याचे डोळे व्हिडिओतल्या जांभळ्या टँक-टॉपमध्ये फुगलेल्या पोटाकडे वळले. डाव्या दिशेला चाललेली हालचाल तशी स्पष्टच होती. शिवकुमार शर्माचं संतूर जितका आनंद देतं, त्याहीपेक्षा जास्त आनंद त्याला त्या हालचालीने झाला होता. कथा-कादंबऱ्या-चित्रपटांमधील लेखी प्रेमपत्रांची जागा ई-मेल्सनी घेतलेल्या जमान्यातले ते दोघे. साहजिकच, त्याही ई-मेलला उत्तर देण्यासाठी उजवीकडच्या Replyच्या खुणेवर क्लिक करायची त्याच्या बोटांना सवयच झालेली. पण पुढच्याच क्षणी भानावर आल्यावर,  साहजिकच, ते न करता, बेडरूममध्ये एकटंच झोपलेल्या आपल्या बाळाच्या बाजूला जाऊन, त्याला घट्ट कुशीत घेऊन, त्यानेही डोळे मिटले. मागच्या दहा-बारा वर्षांच्या जगण्याची पुढच्या चार-पाच तासांत उजळणी होणारच होती. ई-मेलमधून, चॅटमधून चालणारे प्रेमसंवाद प्रत्यक्षातल्या हेव्यादाव्यांमध्ये बदलत जाणं, हे सुद्धा स्वप्नांत ब...

क्षणभंगुर

Image
  छायाचित्र: सोनाली हर्डीकर   क्षणभंगुर ~अनिता म. कांत   जे जे जगती सुंदर त्याची क्षणभंगुर काया दैव म्हणा, प्रारब्ध म्हणा ही अजब असे माया II धृ II   कोषामध्ये विणली स्वप्ने फुलपाखराने फडफड करुनी पंख आपुले उडते मोदाने अजाण परी ते! हात पाठुनी येई पकडाया II १ II   नितळ तटाकी जळात पोहे मासा सोनेरी क्षणात इकडे क्षणात तिकडे उत्साही भारी गळास टाकूनी बसे तीरावर कोळी फसवाया II २ II   कळी गुलाबी फुले निरागस सोनुली वनात प्रसन्न दरवळ , गंधीत होई पुरा आसमंत देवपूजेस्तव कुणी भक्तजन जाती खुडावया II ३ II   तृणपात्यावर थेंब दवाचा विराजे सकाळी रविकिरणांनी हिर्यापरी त्यां येतसे झळाळी मिळे मातीला , वारा जेंव्हा लागे वहावया II ४ II