Posts

पेय

लिहिण्यासाठी जेंव्हा ' पेय ' हा विषय मिळाला , ' दारू ' या विषयाला मुळीच न छेडण्याचा मी ठराव केला ! ' पेय ' म्हणताना आपल्याला , मादकच का आठवते ? पाणी , ज्यूस , चहा , कॉफी -  आपसूकच मागे पडते ? ताक , लस्सी , शेक्स - वेक्स काय " प्यास " भागवत नाहीत ? की उसाच्या रसाचे जया - बच्चन ' अपिलिंग ' वाटत नाहीत ? मादक - बिदक भंकस म्हणत , ठरावावर केला फोकस , पेन कागद सरसावले , मदिरेला ठरवत जाम बोगस ! मेंदूच्या मंथन घाण्यात , काही विचार भरडले   आणि दोन - चार तास खपून खपून , काही - बाही खरडले ..     मनासारखे तरी त्याला , वजन काही येईना   " क्या बात " कॉमेंट येण्याचा , फील काही देईना ..  चहा - कॉफी च्या कटिंग सोबत , दिवसभर धरला बेस , पण संध्याकाळ होता - होता , माझा वाढू लागला स्ट्रेस ! तेवढ्यात कुठून कधी नव्हे ते , नवऱ्यालाही आले प्रेम   अगं घे ब्रेक थोडासा म्हणत , ग्लास दोन भरले सेम ! लिखाण लिखाण कित्ती तुझे , थोडी निवांत हो , फ्रायडे आहे आज यार , हमे कंपनी तो दो....

उब

  "उब" हा शब्द मला नेहमीच आज्जी च्या गोधडीची आठवण करून देतो, आणि या आठवणींसोबतच तिची दुपारच्या वेळी गोधडी शिवत बसलेली मूर्ती सुद्धा डोळ्यासमोर येते. खरं तर आज्जीचा मोजकाच सहवास मला मिळाला. वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत २०-२२ दिवस तिच्या सहवासात घालवायला मिळायचे तेवढेच. पण तिच्या ४ नातवंडातली मी एकुलती एक "नात" असल्याने तिच्या हृदयाचा एक हळवा कोपरा माझ्या मालकीचा असल्यासारखे मला जाणवायचे. आमची आज्जी नऊवारी नेसणारी. तिच्या सुती साड्या सुद्धा तिच्या त्वचेसारख्या मऊ, मुलायम असायच्या. या निगुतीने वापरलेल्या साड्या जुन्या झाल्या की ती त्याच्या गोधड्या शिवायची आणि आम्हा नातवंडांची ती गोधडी पांघरण्यासाठी 'वार' लागायचे. ज्या दिवशी ती गोधडी पांघरून झोपण्याचा योग येई, त्या दिवशी झकास उबदार झोप लागायची.  वयाच्या २९ व्या वर्षी आज्जी विधवा झाली. ९-१० वर्षांच्या संसाराच्या काही आठवणी आणि जन्माला घातलेली ३ मुले यांना घेऊन तिचा पुढचा सगळा घडलेला प्रवास. आज्जी दिसायला गोरीपान, देखणी, ताठ, शिडशिडीत..पण तिच्या चेहऱ्यावरचे आतोनात कष्टांचे आणि कणखर कर्तृत्वाचे तेजच जास्त लो...

झुंज कविता

  झुंज     येऊ देत संकटे कितीही , जखमी करू दे तनामना छाती ठोकून झेल घाव अन झुंज देई तू पुन्हा पुन्हा II धृ II   मिणमिणत्या पणतीस पाहतो वात भिरभिरा विझवाया इवलाली ती ज्योत सावरे थरथरती अपुली काया तेवत राही दिवलीपरी तू, काळोखाच्या पुसुनी खुणा II १ II   घास घ्यावया टपुनी बसला अहि वेढूनी घरट्याला भेदरलेली चिमणी पिल्ले घट्ट बिलगती आईला झडप घालुनी, चोच मारुनी पक्षीण तळपे लढताना II २ II   भरकटलेली नाव एकटी वादळ घोंघावे भवती क्रंदन लाटांचे भयकारी दर्याला येई भरती नावाडी तो एकवटे बळ वल्हे हाती धरताना II ३ II   जरी घेरती चहूबाजूंनी खिन्न सावल्या दु:खाच्या दिशाहीन अन वाटे जीवन प्रतीक्षेत जणू वाटेच्या स्वत:च होऊनी तारा नभीचा , प्रकाश दे लुकलुकताना II ४ II     ~अनिता म. कांत      

झुंज

  हाय ! माझं नाव ईरा . ही माझ्या आई - बाबांच्या लग्नाची गोष्ट आहे . तुम्ही म्हणाल शीर्षक तर ‘ झुंज ’ आहे ! त्याला २ कारणं आहेत . एक म्हणजे रोजच्या आयुष्यात आई बाबा कधीही एकमेकांशी सरळ बोलत नाहीत . टॅाम आणि जेरीसारखे सतत एकमेकांशी झुंज   झुंज  खेळत असतात . आणि दुसरं म्हणजे .. ते येईलच पुढे .  आई बाबा एका मित्राच्या घरी एकमेकांना भेटले . दोघेही सुंदर होते .. होते म्हणजे आहेत . मला अजूनही सुंदरच दिसतात . तर अगदी पहिल्या नजरेत नाही , तरी तिथेच कुठेतरी ते प्रेमात पडले . आई अजून कॅालेजमध्ये होती . एकदम चुटपुटीत , बडबडी आणि चाणाक्ष होती . मी तिला तसं कधीही पहिलं नाही . हां , चाणाक्ष आणि हजरजबाबी ती अजूनही आहे . बाबा अगदी हेड ओव्हर हील्स प्रेमात पडला तिच्या . तसा तोही हॅंडसम होता . नोकरी यथातथाच होती , पण होतकरू होता . आणि मुख्य म्हणजे नितळ , निर्मळ होता . त्यामुळे आईसुद्धा हेड ओव्हर हील्स . पण प्रॅाब्लेम असा झाला की आई एकदा खरंच हेड ओव्हर हील्स पडली . त्याचं झालं अ...