Posts

सहवासी हो

Image
  सहवासी हो ~ निखिल कुलकर्णी  मंतरलेल्या प्रत्येक सकाळी , नव्या लाटा घेवून जुनेच प्रश्न परत परत विचारत का बसलेला असतोस ?   त्याच मुक्या आकाशाला , कधीतरी बोलेल आकाश तुझ्याशी, तुझ्या अस्तित्वाविषयी, असे वाटून ?   खरेतर प्रत्येकाचेच अस्तित्व स्वत:ला निर्गुण करुणे मधे शोधत बसलेले असते अहोरात्र … वाळूच्या त्या एकेकट्या कणांसारखे ..     अथांग अपरंपार निष्ठेने...   एवढी साधी गोष्ट तुला कळू नये ?   एकेक थेंब मिळून झालेला अजस्त्र थेंब, ही तुझ्या कुरूप अस्तित्वाची ओळख तुला पुरेशी नाही का ? आणि काय करायचे आहे तुला तुझ्या जन्माचे गुह्य ऐकून ?   अरे त ्या निराकार आकाशा सारखा तुझा जन्म देखिल अपरंपार असहायतेतूनच झाला असेल कदाचित.   तुझ्या जन्मासाठी कुणीही कसलाही यज्ञ केला नसेल किंवा तुझ्या जन्माचा कुणी कुठेही उत्सव देखिल साजरा केलेला नसेल.   कदाचित,  कदाचित  पृथेचा लाडका चंद्र,  जेव्हा रागाच्या भरात तिला सोडून कायमचा निघून गेला असेल,   त्या दिवशी अशाच ब्राम्हमुहूर्तावर,  सूर्याची चाहूल लागण्यापूर्वी ,    ताऱ्यां...

हिंमत

Image
  “शहाणी आहे ग पोरगी. कधी कुणाच्या अध्यात ना मध्यात. कसलाही हट्ट नाही, त्रागा नाही. अगदी लहानपणापासूनच.” या अर्थाची वाक्ये स्वत:च्या संदर्भात ऐकायची टीनाला सवय झाली होती. तिला कळायला लागले तेव्हापासूनच तिला गरीब, लाजाळू, साधी सुधी ही विशेषणे चिकटली होती. दरवेळी असे काही ऐकले कि ती अजूनच स्वतः मध्ये खोल खोल जायची. ती  ५ वर्षांची असताना एकदाच तिने बाबांजवळ हट्ट केला होता शेजारच्या मीना सारखी सायकल हवी म्हणून. तेव्हा गालावर उठलेली बाबांची पाच बोटे अजून कधी कधी जाणवतात. त्यानंतर तिने कशाचीच मागणी केली नाही. दरवर्षी वाढदिवसाला आई विचारायची,” या वर्षी काय आणायचे आमच्या राजकन्येला?” या प्रश्नाचे उत्तर तिने ठरवून टाकले होते,”तूच सांग आई, मला नाही माहिती.” खोटे. डोक्यात खरे तर मोठी यादी असायची. मिनी सारखी पांढऱ्या शुभ्र रंगाची, खिशावर नाजूक फुलांची एम्ब्रॉयडरी असलेली जीन्स, कोपऱ्यावर राहणाऱ्या मुलाकडे पाहिलेली गेम, शाळेतल्या एकाने घातलेले चाके असणारे शूज. पण तिची हिंमतच नाही व्हायची विचारायची.  तसे बघायला गेले तर तिला काही कमी नव्हते, इतरांच्या दृष्टिने. मस्त मोठे घर, ती, तिचा मोठ...

आश्वस्त

Image
  आश्वस्त ~ निखिल कुलकर्णी तो गेला त्यालाही आता बरीच वर्षे झाली. त्याला तिच्या बद्दल नेमकं काय वाटत होतं, ते नक्की तिलाही ठाऊक नव्हते. पण तिचं त्याच्यावर प्रेम होतं हे निश्चित. तिने बऱ्याच वेळेला ते सांगायचा प्रयत्न देखील केला. पण त्याला पाहिले की, तिचे शब्द कृष्णेच्या घाटावरच्या पायऱ्यांसारखे, तिच्याच विचारांच्या लाटांमध्ये बुडून जात. मग ती नुसतीच त्याच्या कडे मुग्ध होऊन पाहत राहायची. तो देखिल तिच्याकडे काहीसा गोंधळूनच काही क्षण पाहायचा. पण तिच्या तशा मुग्धतेचा अर्थ लावण्याची कसलीही तसदी न घेता पुढे निघून देखील जायचा. तो गेला, की बोलायचे राहून गेलेले तिचे शब्द झरझर ओसरणाऱ्या पाण्यातून एकेक करत वर येणाऱ्या पायऱ्यांसारखे तिला पुन्हा आठवू लागत. आणि मग ती स्वत:वरच चरफडे. आपण इतके कसे वेंधळे? असे वाटून स्वत:लाच दोष देई. आता परत जेव्हा तो भेटेल, तेव्हा त्याला सगळं सगळं एकदा सांगूनच टाकायचे अशा विचाराने ती पुन्हा चालू लागायची. सूर्य निघून गेल्यावर पृथ्वी जशी अंधारात चाचपडत राहते तशी... त्या दिवशी तो जो गेला, तो परत आलाच नाही. ती कितीतरी वेळ त्याची वाट पाहत समुद्रावर उभीच होती. पृथ्वीच...

उंच उंच झुला

Image
  "First the worksheet, then swing." सॅरा म्हणाली. कधीही काहीही करायचं असलं, करवून घ्यायचं असलं माझ्याकडून की नेहमी मला हेच सांगितलं जातं. आधी होमवर्क, मग स्विंग; first clean up, then swing; आधी 'finish the food', मग स्विंग. मला आवडतो झोपाळा. खूप. विनीकडे तर खूप खूप झोपाळे आहेत. चौकोनी झोपाळा, रिंग सारखा झोपाळा, झोळीसारखा झोपाळा... झुला. झोपाळ्यावर बसलं, की सगळ्या गोष्टी कशा नीट समजायला लागतात. जमिनीवरचे पाय उचलले की मी मोकळी होते. झोपाळा वर वर जायला लागला, आणि मान अशी सोडून दिली, की डोकं वाऱ्याबरोबर वाहायला लागतं. कानात वारा भरतो, आणि आजूबाजूचे सगळे सगळे आवाज, सगळा गोंगाट बंद होतो. सगळं कसं शांत शांत... आणि मग डोळे मिटून घेतले की... माझे रंग नाचायला लागतात. पिवळा दोन, निळा चार. मला आवडतात. खूप. मला झोपाळा आवडतो. खूप.  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तिला सांभाळणं थोडं कठीण व्हायला लागलंय. लहान होती तेव्हा ...

होकारांची पिशवी

Image
सकाळी   घरातून   निघताना   ती   पर्सबरोबर   होकारांची   पिशवी   घेते .  का ठापर्यंत   भरलेली .  एखाद   दुसराच   खणखणीत   लोखंडी   किं वा   वजनदार   दगडी .  बाकी   सगळे   चकचकी त ,  वजनानं   हलके ,  कोरे   करकरीत .  वेगवेगळ्या   रंगांचे ,  गुळगुळीत   घो टीव   कागदांचे   होकार .  घरातून   निघतानाच   मीटर   न   पाडणाऱ्या   रिक्षावाल्याला   ती   एक   होकार   देऊन   टाकते .  उशीर   होतोय   म्हणून .   बॉस   आणि   कलीग्ज   साठी   राखून   ठे वलेले   होकार   तर   कसेही   संपून   जा तात .  कधी   अपरेसलवर   परिणाम   होऊ   नये   म्हणून,  कधी   नाती   बिघडू   नयेत   म्हणून,  कधी   आपल्याबद्दलची   मतं   खरा ब   होऊ   नयेत   म्हणून ,  तर कधी ...

समाधिस्थ कवितांच्या हिंदोळ्यावर

Image
  “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” असं ती जेव्हा मला विचारते, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं. ते सुचण्याची प्रक्रिया चालू व्हावी, असं वाटत असतं; तेव्हा ही मात्र डोळ्यांत कुतूहल नि अपेक्षा साठवून, स्वतःच्याच तळहातावर स्वतःचं डोकं धरून, माझ्या मांडीवर रेलून, अधाशासारखी माझ्याकडे बघत असते. मला नि:शब्द, निरुत्तर करण्यात तिला काय मजा वाटते, किंवा कशाचा अभिमान वाटतो, हे तिचं तिलाच माहीत. पण माझ्याकडे एकटक बघत बसणाऱ्या तिच्या रुपड्यातली समाधिस्थ अस्वस्था संपून जायला नको, म्हणून मीच उत्तर शोधायचं - किंवा सापडलेलं उत्तर द्यायचं टाळतो की काय - असंही कधीकधी वाटून जातं. बहारों फूल बरसाओ मधली फुलांच्या झोपाळ्यावर झुलणारी वैजयंतीमाला ही नाही. तसवीर बनाये क्या कोई, क्या कोई लिखे तुझपे कविता, म्हणावीशी शर्मिलासुद्धा ही नाही. झोपाळ्यावाचून झुलायचे, फुलायचे तिचे आणि माझेही दिवस मागे पडले. आताच्या खऱ्या जगण्यातला करडेपणा त्याच जगण्यातल्या खोटेपणाला स्वप्नांमध्येसुद्धा बहरू देत नाही. तरीसुद्धा तिच्यातल्या गृहिणीपणातलं, तिच्यातल्या मैत्रिणीतलं नि प्रेयसीतलं सोज्वळ बाईपण मी उरात का पेरतो, आणि त्या मागून...

शून्यात गर्गरे झाड

Image
  यू एस एस मिडवेच्या धावपट्टीवर एका सरळ रेषेत रचून ठेवलेल्या लढाऊ विमानांच्या मधून वाट काढत, त्या विमानांकडे डोळे विस्फारून पाहत असलेल्या चिमुकल्यांच्या बुटांच्या नाड्यांमधून वाट काढत मी त्यातल्याच एका विमानासारखा वर आकाशात झेपावलो, आणि मागे वळून बघितलं. मिडवेचा एव्हाना ठिपका होत आला होता. ते जहाज, त्या अजस्त्र युध्द्धनौकेवरचं संग्रहालय, ते बघायला आलेले लोक सगळेच जिवाणू, विषाणू म्हणावेत इतके छोटे झाले होते. काही मिनिटांपूर्वीच मी कुणाच्या तरी कोकमधला बुडबुडा झालो होतो; कुणाच्या सॅन्डविचवरचं पातळ कागदी आवरण बेदरकारपणे भिरकावून लावलं होतं; आणि मिडवेवरच्या मिजासखोर अमेरिकन राष्ट्रध्वजासकट इतरही अनेक झेंडे, पताका यांच्या असे काही नाकी नऊ आणले होते, की प्रयत्नपूर्वक एकमेकांना धरून, पाय रोवून उभे राहण्यात त्यांची तारांबळ उडत होती. पण आता मी सॅन डिएगोच्या नेव्ही पिअरपलीकडे. आणि तिथे आता फक्त अथांग पॅसिफिक महासागर. पॅसिफिकसोबत, किंबहुना त्याच्यासारखं आडवंआडवं वाहत जाणं इतकं सोयीचं आणि सवयीचं झालं होतं, की त्यात आता मजा येईनाशी झाली. मर्त्य मानवजातीनं दलांबर की आयनांबर असं काहीसं नाव दिलेल्...