Posts

डिजिटल बैराग्याचे महानिर्वाण

Image
  गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहॉं मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया “नंबर त्वेल, मिडीयम फ्राईज, डाएट कोक?” जॅक इन द बॉक्स च्या जुनाट, तपकिरी, पंजाभर रुंदीच्या खिडकीतून आलेल्या दक्षिण अमेरिकन गोडव्याने साहिरचे शब्द फुटेनासे झाले. कुठली असेल ही? मेक्सिको? निकाराग्वा? पेरू? विचार करताकरताच बैराग्याने त्याचं अमेरिकन एक्स्प्रेस त्या गोडव्याकडे देऊन टाकलं आणि हातात कोंबलेली ब्राऊन बॅग पॅसेंजर सीटवर फेकून तो ड्राईव्ह-थ्रू मधून चालता झाला. “सर, युअर कार्ड” वगैरे खिडकीतले शब्द ऐकून न ऐकल्यासारखे करून. दक्षिण अमेरिकेतून आलेल्या, तपकिरी कातडीच्या, चुणचुणीत नि ‘हॉट’ ललना बैराग्याला स्वतःच्याच जातकुळीतील, कधीकधी रक्ताच्या नात्यातील वाटत. अमेरिकन स्वप्नाच्या ओढीने इकडे येणाऱ्या लमाणांच्या तांड्यातील सगळे शेवटी सारखेच. कुणी भिंतीवरून उड्या टाकून येतात, कुणी भुयारातून, तर आपल्यासारखे कुणी सरळमार्गी, विमानाचं तिकीट काढून नि कागदपत्रं घेऊन. इतकाच काय तो फरक. शेवटी अमेरिकेतलं कुठलं तरी छोटंमोठं शहर सगळ्यांना गिळून टाकतं. रात्रीचे १:२७ वाजले होते. साहिर, देव आनंद, रफीशी जोडलेली माझी नाळ बैरागी ...

उपज

Image
  "बाबा, तू ठीक आहेस? चित्रा आत्याचा फोन आला... मैफिलीतून मधूनच उठून गेलास.. हे असं दुसऱ्यांदा घडतंय बाबा... It's about time... झाले आता.. वर्ष होऊन गेलं आता. अजून किती वेळ घेणारेस सावरायला? आणि इतका त्रास होत असेल ना, तर मग गाण्याचे कार्यक्रम नको घेत जाऊस. लोक तुला ऐकायला मुद्दाम प्रवास करून येतात... " शर्वरी थोडी चिडलीच होती. पण तिच्या बोलण्यातली कळकळ अभिला जाणवत नक्की होती. विशाखा गेल्यापासून हा पहिलाच मोठा कार्यक्रम घेतला होता अभिने. नाही म्हणायला एक छोटी मैफल केली होती एका मित्राकडे... पण तेव्हाही गाता गाता अचानक अभिजीतला भरून आलं तिच्या आठवणीने आणि तो चक्क बंदिश अर्धीच सोडून निघून गेला. सगळेच जवळचे, त्यामुळे ह्याचा फार गवगवा झाला नाही. पण त्यानंतर आलेले चारेक कार्यक्रम अभिने असेच सोडून दिले, मानसिक तयारी नाही म्हणून. अखेर परवाचा कार्यक्रम. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून, आणि चित्राचा आग्रह म्हणून अभिने गायला होकार दिला होता. सुरुवात ठीक झाली. अगदी नेहमीसारखी रंगत नसला तरी रागविस्तार होत होता. दोन राग गाऊन झाल्यावर अभिने ठुमरी गाणार असं म्हंटलं, आणि प्रेक्षकांमधून ...

फुले का पडती शेजारी

Image
Baby moves on Santoor असा विषय असलेला ई-मेल कित्येक वर्षांनी आज अचानक दिसला आणि त्याने क्षणाचाही वेळ न दवडता, लगेच त्यातल्या YouTube linkवर क्लिक केलं. Look at the bottom left side of the belly, इतकी स्पेसिफिक सूचना पुरेशी होती. लागलीच त्याचे डोळे व्हिडिओतल्या जांभळ्या टँक-टॉपमध्ये फुगलेल्या पोटाकडे वळले. डाव्या दिशेला चाललेली हालचाल तशी स्पष्टच होती. शिवकुमार शर्माचं संतूर जितका आनंद देतं, त्याहीपेक्षा जास्त आनंद त्याला त्या हालचालीने झाला होता. कथा-कादंबऱ्या-चित्रपटांमधील लेखी प्रेमपत्रांची जागा ई-मेल्सनी घेतलेल्या जमान्यातले ते दोघे. साहजिकच, त्याही ई-मेलला उत्तर देण्यासाठी उजवीकडच्या Replyच्या खुणेवर क्लिक करायची त्याच्या बोटांना सवयच झालेली. पण पुढच्याच क्षणी भानावर आल्यावर,  साहजिकच, ते न करता, बेडरूममध्ये एकटंच झोपलेल्या आपल्या बाळाच्या बाजूला जाऊन, त्याला घट्ट कुशीत घेऊन, त्यानेही डोळे मिटले. मागच्या दहा-बारा वर्षांच्या जगण्याची पुढच्या चार-पाच तासांत उजळणी होणारच होती. ई-मेलमधून, चॅटमधून चालणारे प्रेमसंवाद प्रत्यक्षातल्या हेव्यादाव्यांमध्ये बदलत जाणं, हे सुद्धा स्वप्नांत ब...

क्षणभंगुर

Image
  छायाचित्र: सोनाली हर्डीकर   क्षणभंगुर ~अनिता म. कांत   जे जे जगती सुंदर त्याची क्षणभंगुर काया दैव म्हणा, प्रारब्ध म्हणा ही अजब असे माया II धृ II   कोषामध्ये विणली स्वप्ने फुलपाखराने फडफड करुनी पंख आपुले उडते मोदाने अजाण परी ते! हात पाठुनी येई पकडाया II १ II   नितळ तटाकी जळात पोहे मासा सोनेरी क्षणात इकडे क्षणात तिकडे उत्साही भारी गळास टाकूनी बसे तीरावर कोळी फसवाया II २ II   कळी गुलाबी फुले निरागस सोनुली वनात प्रसन्न दरवळ , गंधीत होई पुरा आसमंत देवपूजेस्तव कुणी भक्तजन जाती खुडावया II ३ II   तृणपात्यावर थेंब दवाचा विराजे सकाळी रविकिरणांनी हिर्यापरी त्यां येतसे झळाळी मिळे मातीला , वारा जेंव्हा लागे वहावया II ४ II          

जननी

Image
  जननी ~अनिता म. कांत     चित्र: सोनाली हर्डीकर   जननी तू , महाशक्ती तू गे सकल-जगत-धारिणी मूर्त तू होशी जगी, नाना तुझ्या रुपांतुनी II धृ II   तू निळाई सागराची , तू नभाची स्थिरता चिन्मयी तू , स्निग्धता तव दे मनाला शांतता देऊनी आनंद सकळां, दु:ख घेशी शोषुनी II १ II   हरितश्यामल तू धरित्री , मृण्मयी तू सृजना प्राण तू या सृष्टीचा अन जीवनाची प्रेरणा आदि तू , आरंभ तू अन तूच अमृतदायिनी II २ II   तूच दुर्गा , तू भवानी , दैत्यनाशक दामिनी केशरी ज्वालेपरी नवतेज झळके आननी तन्मयी तू प्रगट होशी पापभंजकनाशिनी II ३ II              

पराधीन

Image
' दैवजात दुःखे भरता , दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती , पुत्र मानवाचा '  आमचा गंजका रेडिओ खरखरत होता . माझ्या मनात इमल्यावर इमले चढत होते . मिसरूड फुटायच्या वयात असेन मी तेव्हा . पण तेव्हाच नाही , मला कळतंय तेव्हापासून माझ्या बुद्धीची चाल तिरकीच . अडलेला माणूस आधीच नरम असतो . त्यात तो देवभोळाअसेल तर बुद्धी गहाण . हे मला फार पूर्वी लक्षात आलं . तोच नियम मलाही लागू आहे , हे समजत होतं , पण उमगलं फार नंतर .  घरात दारिद्र्य तळ ठोकून होतं मला आठवतंय तेव्हापासून . त्यात माझ्या बापाला तेच आवडायचं . सगळा गाव त्याला संत म्हणायचा , यातच खुश होता तो . संतांची पोरं साली उपाशी असतात . लोकांना काय जातंय डोक्यावर घ्यायला . देवळात पुजारीहोता माझा बाप . चवली पावलीची मिळकत . त्यात लोकांचा पुळका .  पत्रिका फुकट सांगायचा . पूजा बिजा सांगायला गेला तर देतील ती किडूक मिडूक दक्षिणा घेऊन घरी यायचा . आई तणतण करत कसंबसं निभवायची . तिला सवाष्ण म्हणून सणासुदीला बोलवत तेव्हा खणानी ओटी भरत . पाप ...