जननी
जननी
~अनिता म. कांत
चित्र:
सोनाली हर्डीकर
जननी तू, महाशक्ती तू गे सकल-जगत-धारिणी
मूर्त तू होशी जगी, नाना तुझ्या रुपांतुनी IIधृII
तू निळाई सागराची, तू नभाची स्थिरता
चिन्मयी तू, स्निग्धता तव दे मनाला शांतता
देऊनी आनंद सकळां, दु:ख घेशी शोषुनी II१II
हरितश्यामल तू धरित्री, मृण्मयी तू सृजना
प्राण तू या सृष्टीचा अन जीवनाची प्रेरणा
आदि तू, आरंभ तू अन तूच अमृतदायिनी II२II
तूच दुर्गा, तू भवानी, दैत्यनाशक दामिनी
केशरी ज्वालेपरी नवतेज झळके आननी
तन्मयी तू प्रगट होशी
पापभंजकनाशिनी II३II
Comments
Post a Comment