Posts

पराधीन

Image
' दैवजात दुःखे भरता , दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती , पुत्र मानवाचा '  आमचा गंजका रेडिओ खरखरत होता . माझ्या मनात इमल्यावर इमले चढत होते . मिसरूड फुटायच्या वयात असेन मी तेव्हा . पण तेव्हाच नाही , मला कळतंय तेव्हापासून माझ्या बुद्धीची चाल तिरकीच . अडलेला माणूस आधीच नरम असतो . त्यात तो देवभोळाअसेल तर बुद्धी गहाण . हे मला फार पूर्वी लक्षात आलं . तोच नियम मलाही लागू आहे , हे समजत होतं , पण उमगलं फार नंतर .  घरात दारिद्र्य तळ ठोकून होतं मला आठवतंय तेव्हापासून . त्यात माझ्या बापाला तेच आवडायचं . सगळा गाव त्याला संत म्हणायचा , यातच खुश होता तो . संतांची पोरं साली उपाशी असतात . लोकांना काय जातंय डोक्यावर घ्यायला . देवळात पुजारीहोता माझा बाप . चवली पावलीची मिळकत . त्यात लोकांचा पुळका .  पत्रिका फुकट सांगायचा . पूजा बिजा सांगायला गेला तर देतील ती किडूक मिडूक दक्षिणा घेऊन घरी यायचा . आई तणतण करत कसंबसं निभवायची . तिला सवाष्ण म्हणून सणासुदीला बोलवत तेव्हा खणानी ओटी भरत . पाप ...

शहाण्या वेड्याची गोष्ट

Image
घाटावरच्या गंगारतीच्या झांजा, घंटा, शंख वाजू लागले, तसे वेड्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. डोळ्यांना समांतर वाहत जाणारी गंगेच्या प्रवाहातील दिव्यांची फुलं बघितली, आणि शंकराच्या देवळाबाहेर उडणाऱ्या प्रसादासाठीच्या झुंबडीत नंबर लागायची त्याची शक्यता केव्हाच मावळल्याचा साक्षात्कार त्याला झाला. प्रसादातला डाळभात वेड्याला प्राणप्रिय होता. तो मिळाला, की बाकी काही नको असे. रात्रीच्या अंधारात, लाखो दिव्यांच्या लखलखाटात, वाळक्या काटकीसारखं स्वतःचं शरीर, मणभराचं पोतं उचलावं इतक्या कष्टाने, जोर लावून उचललं, आणि वेडा पाय फुटतील तिकडे झोकांड्या खात जाऊ लागला. उजव्या पायाच्या तळव्याला चिकटलेलं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं कसलंतरी palmphlet डाव्या पायाच्या चवड्याने, शेणात पाय पडल्याच्या भावनेने बाजूला केलं. गणपतीचा प्रसन्न चेहरा दिसल्यावर मात्र त्याला स्वतःचीच शरम वाटली, आणि त्याने तो कागद उचलला. भेळीचा शिळा वास, आठ-दहा अर्धवट ओले कुरमुरे आणि थोडी शेव चिकटलेल्या त्या कागदावर स्वतःच खरडलेलं काहीतरी किलकिल्या डोळ्यांनी बघितलं. काही केल्या त्याला ते वाचता येईना. शेवटी कुठलासा एक शब्द लागला, आणि तो ...
मागच्या फोटोतल्या जख्माळलेल्या पावलामागील भीषण वास्तव मांडल्यानंतर सुचलेली ही काही वेगळी पावले पाऊल एक पाऊल पाऊल, मऊ गुलाबी कोवळं लुसलुशीत स्पर्शानं, मन मोहरून गेलं !!! एक पाऊल पाऊल, घट्ट रोवले मातीत हाते धरून चालता, स्वये निघाले गतीत पावलांचे झाले पंख, घेती गगनी भरारी त्याने घेतली कवेत, दिव्य क्षितिजेच सारी एक पाऊल कुठे ते, स्वैर वाट चुकलेले दलदलीत फसता, कुणी त्याला सावरले !! एक पाऊल नाजूक, कसे मेंदीने सजले दुजे घर उजळाया, माझे भाग्य हो चालले एक एक ते पाऊल, तुझ्या संगे टाकलेले ठसे जन्म -जन्मां साठी, हृदयात उमटले ! एक पाऊल अदृश्य, पडे साता दरिया पार जणू मोत्याविण शिंपा, रिते झाले तैसे घर एक पाऊल तयात, सले काटा तो स्मृतींचा उरी जखम घेऊन, मार्ग चालते आशेचा !!!                                                         ...