चंचल
चंचल
~ अनिता म. कांत
खिडकीमधूनी पाहत बसते
भोवतालचे विश्व विलक्षण
स्थिर एकटी चौकट मोजे
चंचल अचपळ काळाचे क्षण
दस्तक देती काचेवरती
चंचल रजनी आणि चांदवा
शिंपुनी जाती तनामनावर
कोजागिरीचा शुभ्र ताजवा
चंचल करडे पीस तरंगत
कधी येउनी दे आमंत्रण
जणू सांगते, “पत्र लिही तू”
कुणी काढते तुझी आठवण
श्रावणातले ऊन नाचरे
धप्प येउनी बसे कडीवर
चंचल नवख्या सरीसवे ते
लपंडाव खेळते घडीभर
झुळूक चंचल घेऊन येते
नव्या प्रीतीचा गंध मनोहर
धुंद मोगरा तिला मोहवी
डाव खेळतो तिच्याबरोबर
कधी दुपारी येउनी ग्लानी
डोळा मिटता माझा क्षणभर
मावळतीची चंचल किरणे
झणी उठवती येउनी सत्वर
गजाआडचे जग हे “माझे”
स्तब्ध, शांत कायमचे अविचल
पल्याड सगळे अस्थिर जैसे
भिरभिरणारा वारा चंचल
काय असे खिडकीची जादू
शोषून घेते जे क्षणभंगूर
अक्षय, संयत, तृप्त भावना
मनी माझिया रुजवी अंकुर
स्थिर एकटी चौकट मोजे
चंचल अचपळ काळाचे क्षण
दस्तक देती काचेवरती
चंचल रजनी आणि चांदवा
शिंपुनी जाती तनामनावर
कोजागिरीचा शुभ्र ताजवा
चंचल करडे पीस तरंगत
कधी येउनी दे आमंत्रण
जणू सांगते, “पत्र लिही तू”
कुणी काढते तुझी आठवण
श्रावणातले ऊन नाचरे
धप्प येउनी बसे कडीवर
चंचल नवख्या सरीसवे ते
लपंडाव खेळते घडीभर
झुळूक चंचल घेऊन येते
नव्या प्रीतीचा गंध मनोहर
धुंद मोगरा तिला मोहवी
डाव खेळतो तिच्याबरोबर
कधी दुपारी येउनी ग्लानी
डोळा मिटता माझा क्षणभर
मावळतीची चंचल किरणे
झणी उठवती येउनी सत्वर
गजाआडचे जग हे “माझे”
स्तब्ध, शांत कायमचे अविचल
पल्याड सगळे अस्थिर जैसे
भिरभिरणारा वारा चंचल
काय असे खिडकीची जादू
शोषून घेते जे क्षणभंगूर
अक्षय, संयत, तृप्त भावना
मनी माझिया रुजवी अंकुर
Comments
Post a Comment