कृष्णवेध: जखम
~अनिता म. कांत (चित्र: आदित्य आजगावकर)
वाट पाहते कधी घालशी फुंकर तू येऊन जवळी
मोहरेल मग जखम कोवळी उरी असो वा पायतळी IIधृII
रुततो काटा, सलतो काटा, तुझ्या पथावर पुन्हा पुन्हा
तरी चालते ठेऊन हृदयी तुझे हास्य ते सोनसळी II१II
ध्यास तुझा, विश्वास तुझा रे; नजर तुझी फिरता
वरुनी
सुरकुतलेल्या माळावरही चाफ्याची उमलते कळी II२II
करुणा, माया, प्रेम बरसतो गडद रात्रीवर
चंद्र नभी
लख्ख झळाळे प्रकाशात त्या तनु तुझी सावळी निळी II३II
कधी भेट ती होईल अपुली, कधी मीरेला चैन पडे
मिळेल का रे जागा तुझिया उरी असो वा पायतळी II४II
Comments
Post a Comment