तिमिरातूनी तेजाकडे....
लक्ष दीपांच्या प्रकाशी हे चराचर न्हाऊ दे
तिमिरातूनी तेजाकडे हे विश्व अवघे जाऊ दे ।।
आज साऱ्या मानवांचे हित देवा तूच पाहे
युद्ध थोडे आगळे अन शत्रूही अदृश्य आहे
तव प्रभा सृष्टीतूनी चैतन्य होऊन वाहू दे
तिमिरातूनी तेजाकडे हे विश्व अवघे जाऊ दे ।।
सर्वकल्याणार्थ जुळती कर तुझ्या पुढती आता
यत्न जेथे तोकडे, तव कृपा होई पूर्तता
हे दयाळा, तुझी करुणा सतत सोबत राहू दे
तिमिरातूनी तेजाकडे हे विश्व अवघे जाऊ दे ।।
- हिमानी कुलकर्णी
Comments
Post a Comment