वटवाघळाची आरती

 वटवाघळाची आरती

~अनिता म. कांत

जय देव जय देव, वटवाघुळ देवा

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा IIधृII

उतलो मातलो केला विध्वंस

प्राणी जगताचा पुरता र्हास

हाय सर्वांची लागे मानवा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

तोडली वने, लुटले खग

प्रदूषणाने नासले जग

प्रगतीचा परी केला कांगावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

धाडीला विषाणू केले क्रंदन

सर्वत्र मृत्यूचे माजे थैमान

कोप भयंकर कैसा विझवावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

भल्याभल्यानी हात टेकले

बाबा-नेते-वैदू पळून गेले

उपाय सत्वर काही सांगावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

आरसा पाहुनी येई तरस

माणूस नव्हे दिसे राक्षस

जाहला उशीर होता पस्तावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

काय उत्क्रांती काय उद्धार

नरापरता बरा वानर

डार्विन स्वये करितो धावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

घरात कैदी झालो दुर्बळ

जाणवे अपुल्या कर्माचे फळ

दोष दूजास कशास द्यावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

चंगळ-वादी बनून हाय

एक दुजाचे ओढतो पाय

चराचराचाही तोल ढळावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

नको नको जीव घेणारी स्पर्धा

होरपळे प्राण राहिला अर्धा

थांबू जरा घेऊ थोडा विसावा IIII

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

द्यावी सुबुद्धी द्यावा प्रकाश

करा मोकळे आता आकाश

विचार सुदृढ मनी जागवा II१०II

आलो तुमच्या दारी, आश्रय मज द्यावा; वटवाघुळ देवा IIधृII

Comments

Popular posts from this blog

अमेरिकेत भेटलेला बुद्धिस्ट

फुलपाखरू