काना आणि मात्रा
काना आणि मात्रा
~अनिता म. कांत
धरुनिया आस I मराठीत खास
टंकलेखनास I
शुभारंभ II
परक्या लिपीत I
शब्दांना कोम्बीत
होई गुंतागुंत I
बोटांमाजी II
काना आणि मात्रा I
यांची अंतयात्रा
भिवविते गात्रा I
वाक्य-पंक्ती II
डोहात सावळ्या I
भावनेत भोळ्या
खाती गटांगळ्या I
विराम-चिन्हे II
विचारांचे घोडे I
धावे पुढेपुढे
शब्दही बापुडे I
मागे येती II
अगम्यची अर्थ I
होतसे अनर्थ
अक्षरांची व्यर्थ I फरफट II
ठेवावा आदर I
करावा उद्धार
वाचवी सत्वर I
मायबोली II
Comments
Post a Comment